प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतातील सिंचनाचे स्रोत उचक्या देत आहेत. तरीही निसर्गाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीची तयारी करीत कपाशी बियाणे डोबणे सुरू केले आहे.मागील वर्षी ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी मे महिन्यातच कपाशीचे बियाणे डोबले होते. यंदा तप्त ऊन, आटलेल्या विहिरी पाहून शेतकºयांनी धाडस केले नाही. मात्र, काही शेतकऱ्यांनी भरउन्हात व पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना धूळपेरणीचे धाडस करून शेतीत चक्क जुगार खेळणे सुरू केल्याची स्थिती आहे.ज्या शेतकºयांच्या शेतातील विहिरीत पुरेसे पाणी आहे, ते ठिंबक, स्प्रिंकलरचा वापर करून पाणी देईल. मात्र, तप्त ऊन कोवळ्या रोपट्यांची वाट लावण्याची जास्त शक्यता आहे. आज-उद्या पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, पाऊस कधी येईल याचा नेम नाही. शेतकऱ्यांनी बियाणे जमिनीत टाकताना अतिरिक्त धाडस करणे धोक्याचेही ठरू शकते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. कृषी तज्ज्ञाचा सल्ला शेतकºयांना फायद्याचा ठरणारा आहे.पावसाची प्रतीक्षा कायमचजोरदार पाऊस होईल, अशी सर्वांना आशा असली तरी तो प्रत्यक्ष केव्हा बरसेल, याची प्रतीक्षा कायम आहे. महागडे बियाणे भरउन्हात जमिनीत टाकणे सुरू आहे. कृषितज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या मते आता लावलेली कपाशी व पावसाने जमीन चिंब झालेली असताना लावलेली कपाशी यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा व सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरीशेतीत हा जुगार खेळतात. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी धूळपेरणीचे धाडस केल्यास आर्थिक फटका सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाऊस नसतानाही शेतकऱ्यांकडून धूळपेरणीची लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:42 PM
जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतातील सिंचनाचे स्रोत उचक्या देत आहेत. तरीही निसर्गाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीची तयारी करीत कपाशी बियाणे डोबणे सुरू केले आहे.
ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा कायमच : निसर्गाच्या आशेवर शेतकऱ्यांचा शेतीत जुगार