शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:37 PM

सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले ....

ठळक मुद्देएम.एच. शेख : ५ सप्टेंबरला दिल्लीत काढणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले व जगभरातील उद्योगपतींसह देशभरातील मोठ्या श्रीमंत उद्योगपतींना प्रचंड सवलती देवून जनतेच्या पैशाने उभारले सार्वजनिक कारखाने बंद करून उद्योगपतींना कवडीमोल भावात विकले असा आरोप सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनिसन्स (सिटू) चे राज्य जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. एम.एच. शेख, यांनी जिल्हा सिटूच्या विस्तारीत बैठकीत केला.आशा वर्कर कर्मचारी संघटनेच्या सचिव अर्चना घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. याप्रसंगी मंचावर सिटूचे राज्य कोषाध्यक्ष के.आर. रघु, उपाध्यक्ष सदई अहमद, सिटूचे राज्य कौन्सील सदस्य, नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, जिल्हाध्यक्ष रंजना सावरकर उपस्थित होते.बैठकीत कामगार रामभाऊ ठावरी, घिमे, अनिता राऊत, संध्या संभे, रमा ढोले, सविता जगताप, कल्पना चहांदे, प्रमिला वानखेडे, तुषार येवतकर, महादेव मोहिते, महावीर काच्छी, नागमोते यांनी आपल्या समस्यास मांडल्या.यावेळी बोलताना शेख म्हणाले की, खाजगी उद्योगपतींच्या हितार्थ कामगार कायद्यांत मालकांच्या हिताचे बदल केले. शेती क्षेत्रात विदेशी बियाणे कंपन्यांना परवानगी दिली. विदेशी शेतमालाचे आयातीवरील सर्व बंधने हटविली गेली. परिणामी विकास होण्याऐवजी बंद उद्योगांची संख्या वाढली. कामगार बेरोजगार झाले. या बैठकीत ९ आॅगस्टच्या वर्धा सत्याग्रही मोर्चा व ५ सप्टेंबर २०१८ चा दिल्ली मोर्चाची तयारीबाबत चर्चा झाली संचालन भैय्या देशकर तर आभार रंजना सावरकर यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस