शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:21 PM

येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देअपंगत्वामुळे भोगतो मरणयातना : आत्महत्येची मागितली परवानगी

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. यातही अपंगत्व जर एखाद्या घरात आले तर त्याला उपचार करणे ही कठीण जाते असाच प्रकार विरुळ येथील संजय दाभाडे या तरुणाच्या बाबत घडला आहे.संजय हा इतरासारखा सुदृढ व मेहनती तरुण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण अंग मेहनतीचे काम करुन आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांचे व आजारी बहीणीचे पोट भरत होेता. म्हातारपणामुळे आई वडीलांनी जगाचा निरोप घेतला व काही दिवसातच आजारपणामुळे बहीणीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे बहीणीच्या दोन लहाण मुलींची जबाबदारी त्यावर आली ही जबाबदारी तो यशस्वीपणे पार पाडत असतांना संजय आजारी पडला व या आजारपणात त्याला कायमचे अपंगत्व आले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे तो उपचार करु शकला नाही. संजयला आता उभेही राहता येत नाही जमीनीवर घुसुन त्याला पुढे जावे लागते. शेजारील व्यक्ती त्याला उचलुन नेतात. शासनाच्या सहाशे रुपये निराधाराच्या मानधनावर तो कसाबसा जगत असतांना मागील सहा महिन्यांपासुन त्याचे निराधाराचे मानधन बंद झाले. तो आर्थिक अडचणीत अडकला आहे. मानधन सुरु करावे म्हणुन तो सबंधित अधिकाºयांना विनवणी करीत आहे मात्र शासनाचे निगरगट्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्याने शासनाला आत्महत्या करण्याची परवानगी मागीतली आहे. तहसील व बँकेचे कर्मचारी त्याला हे कागद पत्र आणा ते पत्र आणा म्हणुन त्रास देत आहे त्याला जाग्यावरुन उठताच येत नाही त्यामुळे तो कागदपत्राची पुर्तता करु शकत नाही. त्यात त्याचे राहते घर ही कोसळण्याच्या मार्गावर आहे अपंग कोट्यातून घरकुल मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा शासनाकडे अर्ज सादर केला परंतु अजुनही घरकुल मिळाले नाही. अशा बिकट स्थित तो मरणयातना सहन करीत जगत आहे.