लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अधिकाºयांच्या गैरहजेरीमुळे सध्या नगर पंचायतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात आजारांचा फैलाव होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.न.प. मुख्याधिकारी व अभियंता आठवड्यातून दोन दिवस हजेरी लावतात. यामुळे दैनंदिन कामांवर विपरित परिणाम होत आहे. सध्या आजारांचे थैमान आहे. जनतेला पाणी पुरविणारा नगर पंचायतीचा व्हॉल्व्ह लिकेज आहे. त्या खड्ड्यात साचलेले दूषित पाणी व्हॉल्व्हमधून नळाद्वारे थेट घरोघरी जात आहे. यामुळे कावीळ आदी गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेकांनी सभापती गजानन राऊत यांना माहिती दिली. नगर पंचायतीने फॉगिंग मशीन खरेदी केली. सध्या डासाचे थैमान आहे. डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू आहे; पण फॉगिंग मशीनचा वापर करण्यात आला नाही. या अनागोंदीमुळे नागरिक त्रस्त असून वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.सदर लिकेज व्हॉल्व्हच्या पाईप जाम-उमरेड रोडच्या खालून लिक असल्याने जेसीबीने रोड फोडून काम करावे लागणार आहे. त्यासाठी जेसीबी बोलविण्यात आला आहे. जेसीबी आल्यानंतर काम केले जाईल.- गजानन राऊत, पाणीपुरवठा सभापती, नगर पंचायत, समुद्रपूर.
दूषित पाणी पुरवठ्याने आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 10:12 PM
अधिकाºयांच्या गैरहजेरीमुळे सध्या नगर पंचायतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरात आजारांचा फैलाव होत आहे.
ठळक मुद्देनगर पंचायतचा प्रताप : नागरिकांचे आरोग्य धोक्यात