शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळणार

By admin | Published: June 29, 2017 12:42 AM

मृग नक्षत्रातील काही दिवस पावसाचा थेंबही न आल्याने नक्षत्राच्या शेवटच खरीपाच्या झालेल्या पेरण्यांना अखेर

आर्द्रा नक्षत्राची मिळाली साथ : कपाशी डोबणी व सोयाबीन पेरणीच्या कामाला वेग लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : मृग नक्षत्रातील काही दिवस पावसाचा थेंबही न आल्याने नक्षत्राच्या शेवटच खरीपाच्या झालेल्या पेरण्यांना अखेर आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्याने दुबार पेरणीचे संकट दूर होण्यास बळीराजाला मदत मिळाली. सेलू तालुक्यात अजूनपर्यंत सुद्धा खरीपातील पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. तालुक्यात मागील खरीप हंगामात २९ हजार ६६५ हेक्टर मध्ये कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा आतापर्यत २२ हजार हेक्टर मध्येच पेरणी झाली आहे. तर ९ हजार हेक्टर मध्ये असणाऱ्या तुरीचा पेरा ४ हजार ५०० हेक्टर मध्येच झाला आहे. मागील हंगामात सोयाबीनचा १० हजार १६५ हेक्टर मध्ये असणारा पेरा आतापावेतो ६५०० हेक्टर मध्येच झाला आहे. जवळपास कपाशीची लागवड ८० टक्के पूर्ण झाली असून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी थांबविली होती. मृग नक्षत्रात लागवड केलेली कपाशी व सोयाबीनची दुबार पेरणी होईल अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात होती पण आर्द्रा नक्षत्रात सोमवारला दुपारच्या सुमारास आलेल्या दमदार पाऊस व मंगळवारला दिवसभर असलेली पावसाची रिमझीम काही प्रमाणात दुबार पेरणी होण्यापासून थांबविण्यात यश मिळाले असले तरी काही अल्प प्रमाणात दुबार पेरणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा यंदा शेती खर्च वाढला आहे. महिला मजुरांच्या मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेती बजेट वाढले आहे. कपाशीच्या लागवडीत ३० टक्के बियाणे बाद सोमवार, मंगळवारला आलेल्या पावसाच्या सरी पाहता शेतकऱ्यांनी कपाशी लावल्यानंतर न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा लागवड करण्यास सुरुवात केली आहे. याला डोबणं असे म्हटल्या जाते, मात्र मृग नक्षत्रात लागवड केलेल्या कपाशीत ३० टक्क्याहुन अधिक बी खलंगा(बाद) गेल्याचे शेतकरी सांगत आहे.