पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा नदीपात्रात आठ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात मोठे असे वर्धा अप्पर धरण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणातून आर्वी, अमरावती, मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तर त्याच परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केल्या जातो; पण मागील दोन वर्षांतील अत्यल्प पर्जन्यमान यामुळे धरणही पाहिजे तसे भरले नाही. तर सध्या या धरणात ९६.६४ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.यंदा या धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे. तर परिसरातील अनेक विहिरींनी व बोअरवेल सध्या कोरड्या झाल्याने नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसात या धरणातील पाणी पातळीत मोठी घट होत नागरिकांना जलसमस्येला तोंड द्यावे लागेल असे सांगण्यात येते. आर्वी शहरापेक्षा परिसरातील गावांमध्ये सध्या नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.असे असले तरी लोकप्रतिनिधी केवळ शांत बसून असल्याचे दिसते. जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण केल्यास वाढेल पाणी साठवण क्षमताशासनाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाखोली करणाची कामे हाती घेण्यात येतात. शिवाय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक धरणांमधून गाळ काठून त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ केली जाते. असाच काहीसा प्रयोग अप्पर वर्धा धरणासंबंधी करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढे आले पाहिजे. ही काळाजी गरज असल्याचे सुजान नागरिक सांगतात. अप्पर वर्धा धरण गाळमुक्त झाल्यास त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. शिवाय त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना होईल.
अप्पर वर्धाच्या जलसाठ्यात झपाट्याने होतेय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 9:52 PM
अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठळक मुद्देकेवळ ९६.६४ दलघमी पाणीसाठा : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे