शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

महामार्गामुळे तीन तालुक्यात आली ‘समृद्धी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:43 PM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे.

ठळक मुद्दे३४ गावांना लाभ : ७३५ शेतकऱ्यांचे उंचावले जीवनमान

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाले असून त्याचे जीवनमानही उंचावले आहे.रस्ते, महामार्ग या विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. त्यामुळे शासनाने रस्ते व महामार्ग निर्मितीवर भर दिला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातून जात असल्याने या तिन्ही तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची ५७९.४६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यापैकी ७७३ शेतकऱ्यांनी संपादनाकरिता संमती दर्शविली आहे. शासनाने आतापर्यंत ७३५ शेतकऱ्यांकडून ४९८.८१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित १४१ शेतकऱ्यांची ८०.६४ हेक्टर जमीन संपादित करणे शिल्लक आहे. तिन्ही तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांना शासनाने ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान पालटले असून इतरही शेतकऱ्यांच्या शेतीला सोन्यापेक्षाही झळाळी आली आहे. परिणामी, महामार्गाने नावाप्रमाणेचे शेतकऱ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे.सेलू तालुका कोट्यधीशांचासमृद्धी महामार्गाकरिता वर्धा, आर्वी व सेलू या तिन्ही तालुक्यांपैकी सेलू तालुक्यातील सर्वाधिक जमीन खरेदी करण्यात आली. सेलू तालुक्यातील शेतीही सुपीक व बागायती असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मोबदला मिळाला आहे. वर्धा तालुक्यातील २९२ शेतकऱ्यांपैकी २७१ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असून त्यापैकी २३९ शेतकऱ्यांची १७५.६२२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. आर्वी तालुक्यातील १८५ शेतकऱ्यांपैकी १६५ शेतकऱ्यांकडून १०१. ६१ हेक्टर जमीन संपादित केली आहे, तर सेलू तालुक्यातील ३९९ शेतकऱ्यांपैकी ३३९ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने आतापर्यंत ३३१ शेतकऱ्यांकडून २२१.५८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली आहे. याचा मोबदला म्हणून या शेतकºयांना २०७ कोटी ७० लाख ०८ हजार ३६० रुपये देण्यात आले आहे. हा मोबदला दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.३४ गावांतील शेतकऱ्यांचा वाढला बँक बॅलन्सवर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी (मेघे),पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली व लोणसावळी तर आर्वी तालुक्यातील बोरी, माणकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरुळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव आणि सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.),धोंडगाव, आमगाव(ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे) या ३४ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. दरवर्षी बँक खात्यात राहणारा ठणठणाट आता दूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात मोठी रक्कम आल्याने शेतकऱ्यांनी त्याची गुंतवणूक करीत दुसरी शेती घेण्यासोबतच लहान-मोठा व्यवसायही सुरू केला. काहींनी उद्योग उभारला. तसेच मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम व मुला-मुलींच्या विवाहाची तडजोड करून ठेवली आहे. तर काहींनी वाहने खरेदीसह ऐशोआरामावर भर दिल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग