शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा

By admin | Published: May 09, 2016 2:08 AM

रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा,

अपघात बळावले : वाहनांची संख्या वाढल्याने वारंवार वाहतूक होते ठप्पघोराड : रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा, वाढता किराया पाहता रस्त्यालगत व्यवसाय लावून कमाईचा मार्ग त्यांना सोयीचा वाढला. पण ज्या मार्गावर व्यवसाय थाटण्यात आले त्या मार्गांवर आज अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे आता रस्त्यांचा श्वास गुदमरतो आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्याची सीमा संपताच वर्धा जिल्ह्यात प्रवेश होतो. सेलडोह पासून वर्धेपर्यंत येणारा हा रस्ता प्रत्येक गावानजीक रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अपघातास हे अतिक्रमणआता कारणीभूत ठरत आहे. सेलडोहपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या खडकी येथे रस्त्यालगत असणारे हॉटेल पाहता बहुतांश वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथे कधीकधीच वाहतूक पोलीस उपस्थिती राहतात. त्यामुळे येथे नेहमीच अपघाताची शक्यता असते. खडकीवरून पुढे जाताना ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या केळझर येथे नेहमीच प्रवाश्यांनी वर्दळ असते. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेपर्यंत आपली दुकाने, हातगाडी व ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या लावल्या आहेत. येथे रस्ता मोठा असल्याने वाहने भरधावपणे ओव्हरटेक करतात. त्यामुळे येथे सर्वाधिक ापघात घडत आहेत. याच गावानजीक बोर प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्याजवळ रस्त्यावरच रस्त्याच्या दोनही बाजूने ट्रक चालक आपली वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीचा खो०ळंबा होतो. महाबळा नजीक रस्ता खराब असूनही येथे रस्त्यालगत अतिक्रमण वाढले आहे. सेलू येथील विकास व यशवंत चौकात तर व्यावसायीकांनी अतिक्रमण केल्याने येथे मोठे मार्केटच तयार झाल्याचा भास होतो. त्यातच आॅॅटोचालकाच्या मनमानीने कळस गाठल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे रस्त्यावर उभे राहूनच प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. कान्हापूर ते पवनार या दीड कि.मी. रस्त्याच्या रस्त्याला तर फळबाजाराचे स्वरूप आले आहे. ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून फळांची खरेदी करतात. त्यामुळे ही बाजारपेठ रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सिमेपासून ३२ कि.मी. अंतरावर वर्धा शहर आहे. आधी हे अंतर कापावयास फार फार तर ंअर्धा तास लागत असे. पण आता अतिक्रमण आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे हे अंतर पार करण्यात एक तासाचा वर अवधी लागतो. पण वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला लावलेली दुकाने किती सुरक्षित असा प्रश्न पडत आहे. अतिक्रमणामुळे वाहन धारकांना रस्ता पार करताना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या मार्गावर झालेले अनेक अपघात पाहता प्रशासनाने सजग होणे आवश्यक आहे. तसेच सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणीही प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर) अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या घोराड- वर्धा नागपूर मार्गावर सेलू येथे असणाऱ्या विकास चौकात रस्त्यालगत असणारे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वृत्त २७ एप्रिलला लोकमतने ‘विकास चौकाला अतिक्रमणाचा विळखा’ या शीर्षकाखाली प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत विकास चौक ते घोराडपर्यंत रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावल्या आहे. बातमी प्रकाशित होताच सेलू तालुका युवा सेनेने अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर विकास चौक ते घोराड या एक ते दिड कि.मी अंतरात सेलू बोरधरण रस्त्यालगत ज्यांनी आपली दुकाने लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे, अशा सर्व अतिक्रमणधारकांना सा. बां. विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी ३ मे रोजी नोटीस बजावली. १० दिवसाच्या आत अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढावे, अन्यथा अतिक्रमण काढण्यास येणारा खर्च अतिक्रमणधारकाकडूनच वसुल करण्यात येईल असे या नोटीसद्वारे कळविले. त्यामुळे सदर अतिक्रमण लवकरच हटणार, अशी चिन्हे दिसत आहेत. सा. बां. विभागाने दिलेली मुदत संपताच केव्हा कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा रस्ता लवकर मोकळा व्हावा अशी आशा व्यक्त होत आहे.