सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय या दोन रुग्णालयांना राज्य शासनाने कोविड रुग्णालयाचा दर्जा प्रदान केला. या दोन्ही रुग्णालयात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्याच कमी होत असल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनला मागणीच नाही. मागील पंधरवड्यापासून स्टाकिस्टकडे रुग्णालयांकडून रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी नाही. या इंजेक्शनचा वैधता कालावधी केवळ तीन महिनेच असल्याने स्टाकिस्ट इतरत्र पुरवठा करण्यात अथवा कंपनीला परत करण्याच्या मानसिकतेत आहेत.आरोग्य यंत्रणा अनभिज्ञजिल्ह्यात दररोज किती इंजेक्शन लागतात, साठा किती आहे, यासंदर्भात माहितीकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती देण्यास कायम टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.मेडिकलची यादीसाईनाथ एजन्सीजश्रीकृष्ण एजन्सीजकमलेश एजन्सीजया ठोक विक्रेत्यांकडे केवळ हे रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहे. एकाही खासगी रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा नसल्याने खुल्या बाजारात उपलब्ध झालेले नाही.जिल्ह्यात विविध कंपन्यांचे निरनिराळे दरमध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. रेमडेसिव्हर या इंजेक्शनची विविध नामांकित कंपन्यांनी निर्मिती केली असून किमतीही वेगवेगळ्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य केंद्रात रुग्णांना २ हजार ३६० या सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. सिप्ला कंपनीचे सिप्रीमी ३ हजार २०० रुपयांना उपलब्ध होत आहे. हेट्रो आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांचे रेमडेसिव्हर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपयांचे असून १५ टक्के सवलतीच्या दरात म्हणजेच ३ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आणि आधार कार्ड दाखविल्यानंतर रुग्णांना हे रेमडेसिव्हर इंजेक्शन स्टॉकिस्ट आणि कोविड रुग्णालयांकडून उपलब्ध करून दिले जात आहे, अशी माहिती औषधी निरीक्षक सतीश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या रोडावल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी नगण्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 5:00 AM
मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. रेमडेसिव्हर या इंजेक्शनची विविध नामांकित कंपन्यांनी निर्मिती केली असून किमतीही वेगवेगळ्या आहेत. झायडस कॅडिला कंपनीचे इंजेक्शन प्रधानमंत्री जनआरोग्य केंद्रात रुग्णांना २ हजार ३६० या सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. सिप्ला कंपनीचे सिप्रीमी ३ हजार २०० रुपयांना उपलब्ध होत आहे. हेट्रो आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांचे रेमडेसिव्हर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपयांचे असून १५ टक्के सवलतीच्या दरात म्हणजेच ३ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होत आहे.
ठळक मुद्देशहरातील विक्रेत्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध, सेवाग्राम येथील रुग्णालयाला केंद्र शासनाकडून होतो पुरवठा