शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

वर्धा-आर्वी राज्यमार्गावर खड्ड्यांचा सुकाळ

By admin | Published: January 24, 2015 11:00 PM

एक वर्षापूर्वी वर्र्धा-खरांगणा-आर्वी मार्गाचे डांबरीकरण झाले़ हे काम आटोपताच पुन्हा खड्डे पडण्यास सुरूवात झाली़ शिवाय अनेक ठिकाणी पुलांच्या कडांना भगदाडे पडली़ या खचलेल्या

खरांगणा (मो.) : एक वर्षापूर्वी वर्र्धा-खरांगणा-आर्वी मार्गाचे डांबरीकरण झाले़ हे काम आटोपताच पुन्हा खड्डे पडण्यास सुरूवात झाली़ शिवाय अनेक ठिकाणी पुलांच्या कडांना भगदाडे पडली़ या खचलेल्या कडा व खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे़वर्धा ते आंजीपर्यंतच्या रस्त्यावर दीड वर्षापूर्वी हॉट मिक्सींचा थर देण्यात आला होता़ येळाकेळी पुलाजवळ गावापर्यंत उखडलेला हा रस्ता ठिगळे लावून जोडण्यात आला़ सुकळी शिवारात रपट्यालगत रस्त्याला लावलेली डांबरीकरणाची ठिगळेही पुन्हा खड्ड्यांत रूपांतरित झालीत़ मजरा-खरांगणा हा चार किमी रस्ता तर खड्ड्यांची मालिकाच झाला आहे़ रस्ता तयार केल्यावर एक पावसाळाही तो सोसू शकला नाही़ गिट्टीवर टाकलेला डांबरी थर कधीच बेपत्ता झाला़ खालच्या जाड खडी कुठे दिसतात तर कुठे खालचा रस्ता चांगला; पण वरची डांबरी लेअर गायब दिसते़ हे खड्डे चुकविणे वाहनधारकांना जीवघेणे ठरत आहे़सालई-मजरा शिवारानजीक श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीजवळ या राज्यमार्गाच्या निंब पूल नामक रपट्याला एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे़ रात्री वाहन धारकांना हा खड्डा जीवघेणा ठरत आहे़ दोन दिवसांपूर्वी सिमेंट घेऊन जाणारा एम़एच़ ३२ क्यू़ ६५५ हा २२ चाकी ट्रेलर खड्ड्यांतून वाचविण्यासाठी रोड सोडून शेतात रूतला़ मोरांगणा ग्रा़पं़ जवळील नवीन पुलाच्या कडा मुख्य डांबरी रस्त्यापर्यंत खचल्या़ यामुळे ओव्हरटेकच्या नादात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे़ तळेगाव-चांदणी-दानापूरपर्यंत चार किमी रस्ता चांगला असला तरी पिंपळखुटा येथे पुलाजवळ रस्ता दबला आहे़ उंच-सखल भागातून वाहने हेलखावे खात समोर जातात़ वाढोणा फाट्याजवळ तर लांब व अर्थगोलाकार डांबरी उंचवटे तयार झाले़ याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)