लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना निर्देश द्यावे व नुकसान झालेल्या शेतकरी, शेतमजुरांना नुकसानभरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वर्धा जिल्हा कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्वीकारले.वादळी वाºयाचा ३८५ घरांना फटका बसला आहे. कुक्कुटपालन केंद्राचे छत उडाल्यामुळे त्यामध्ये असलेल्या २०० ते २५० कोंबड्यांचा मृत्यू झाला. वीज पडल्याने देवळी तालुक्यात दोन बैल, एक गाय, वर्धा तालुक्यात दोन बैल, आर्वी तालुक्यामध्ये दोन गार्इंचा मृत्यू झाला. १ जूनच्या वादळामुळे १९८ घरे पडली व ५ जूनच्या वादळामुळे १८५ घरांचे नुकसान झालेले आहे. चिकणीत गोठा उडाल्यामुळे ५ शेळ्यांचा मृत्यू झाला व तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. दिघी बोपापूर शिवारात वीज पडून गाईच्या पोटात असलेल्या वासराचा मृत्यू झाला. नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.यावेळी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, अजय सिन्हा, रवी माडवे, नंदू कांबळे, राजेंद्र कांबळे, भीमराव सोमे, एस.आर. नारघरे, अनिल शेंद्रे, अनिकेत कोटमकर, शोभा ताकसांडे, अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.कर्मचारी राज्य विमा निगमच्या सुविधेपासून वंचितआदेशाप्रमाणे कामगारांकडून १:७५ व कंपनीकडून ४:७५ असे ६.५० रुपये कपात करून शासनाकडे रक्कम जमा होऊनसुद्धा वर्धा जिल्ह्यातील कामगारांना कर्मचारी राज्य विमा निगम (इएसआय) सुविधा अजूनपर्यंत देण्यात आली नाही. जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट येथे एमआयडीसी असून मोठे उद्योग आहेत. कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य विमा निगम (इएसआय) वर्धा येथे दवाखाना व कार्यालय नाही. कंपनीच्या कामगारांवर मोफत उपचार केले जात नाही. बाहेरून औषधी घेतल्यास (इएसआय) च्या डॉक्टरच्या शिफारशीशिवाय बिले मिळत नाही. त्यामुळे कामगार सुविधेपासून वंचित राहतो. जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाना, कार्यालय देण्यात यावे याबाबतचे निवेदन कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. यावेळी वर्धा जिल्हा कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते धर्मपाल ताकसांडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:49 AM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत ...
ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन