शासनाचे वेळकाढू धोरण : बीएएमएस डॉक्टर देतात निवृत्तीपर्यंत सेवा भास्कर कलोडे हिंगणघाटप्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा डॉक्टरांअभावी कोलमडली आहे. येथील सहा आरोग्य केंद्रात १२ पैकी सहा एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे. अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने याचा फटका रुग्णाना बसणार आहे.उपविभागातील हिंगणघाट तालुक्यात बुरकोनी, अल्लीपूर, कानगाव तर समुद्रपूर तालुक्यात मांडगांव, गिरड, नंदोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या सहा आरोग्य केंद्रात प्रत्येकी दोन अशा १२ डॉक्टरची गरज असतांना बुरकोनीत दोन, कानगावात एक, मांडगावमध्ये एक, गिरड एक, नंदोरीत एक असे एकूण सहा एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत. अल्लीपूरच्या दोन व कानगावच्या एका डॉक्टरने नुकताच राजीनामा दिल्याने या आरोग्यकेंद्रात जागा रिक्त झाल्या आहे. तर जिल्ह्यात तीन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. उपविभागातील हिंगणघाट तालुक्यात बुरकोनी, अल्लीपूर व कानगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तृतीय व चतुर्थ श्रेणीची संवर्ग निहाय एकूण १३५ पदे मंजूर आहेत. यातील ३५ पदे रिक्त आहेत. हिच अवस्था समुद्रपूर तालुक्यात मांडगांव, गिरड, नंदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. १०६ पैकी ३३ पदे रिक्त आहेत. एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, औषधी निमार्ता, प्रयोगतंत्रज्ञ, आरोग्य सेवक, सेविका, शिपाई, सफाई कामगारांचा अभाव आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ३१ आयुर्वेद अॅलोपॅथी डीस्पेंसरीपैकी २५ मध्ये बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहे. यापैकी ११ डॉक्टर गत १० वर्षांपासून अस्थाई सेवेत आहेत. उर्वरीत सहा जागा अनेक वर्षांपासून नियुक्तिच्या प्रतीक्षेत आहे. या डीस्पेंसरीतील बीएएमएस डॉक्टर मात्र सेवानिवृत्तीपर्यंत सेवा देत आहे.
रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा बट्टयाबोळ
By admin | Published: September 25, 2016 2:08 AM