शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
3
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
4
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
6
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
7
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
8
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
9
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
10
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
11
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
12
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
13
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
14
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
15
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
16
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
17
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
18
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
19
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
20
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

जादूटोण्यावरून उफाळलेला वाद संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:34 AM

शेजारच्या व्यक्तीने जादूटोणा केल्याने पुतणी आजारी पडली, असे सांगणाऱ्या एका मांत्रिकामुळे हिंगणी येथील

अंनिसच्या तक्रारीवरून पोलिसांनी केली मध्यस्थी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेजारच्या व्यक्तीने जादूटोणा केल्याने पुतणी आजारी पडली, असे सांगणाऱ्या एका मांत्रिकामुळे हिंगणी येथील नागोसे आणि चरडे या दोन कुटुंबात मागील काही दिवसांपासून कडाक्याचे भांडण सुरू होते. दरम्यान, जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने नागोसे कुटुंबाने महाराष्ट्र अंनिसकडे मदत मागीतली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत प्रकरण दाखल केल्यानंतर ठाणेदारांच्या मध्यस्थीने कथित जादूटोण्याचा वाद संपुष्टात आणल्याने नागोसे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. हिंगणी येथील देवनगर वॉर्डातील रहिवासी गंगाराम नागोसे हे मागील ३२ वर्षांपासून गावातच छोटासा किराणा दुकान चालवितात. ते दिव्यांग आहेत. त्यांच्या घराशेजारी तेजा चरडे यांचे कुटुंब राहते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चरडे यांची पुतणी आजारी पडली. औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी यवतमाळ येथील मांत्रिकाचा सल्ला घेतला. शेजारी राहणाऱ्या नागोसे यांनीच करणी केल्याने पुतणी आजारी पडली, अशी माहिती त्या मांत्रिकाने दिल्याने दोन्ही कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे माहितीपत्रकात नमूद केले आहे. तेजा चरडे यांनी आजारी पडलेल्या पुतणीला बरे कर; अन्यथा जीवे मारू, अशी धमकी देऊन नागोसे यांच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेमुळे नागोसे कुटुंबामध्ये दहशत निर्माण झाली. परिणामी, नागोसे यांनी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्याकडे सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर जिल्हा बुबावाजी संघर्ष विभागाचे कार्यवाह भरत कोकावार यांना सोबत घेऊन रविवारी सेलू ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संजय बोठे यांनी हिंगणी येथील तेजा चरडे यांना लगेच ठाण्यात बोलावले. सुरकार यांनी जादूटोणा अस्तित्वात नसल्याचे समजावून सांगितले. ठाणेदारांनीही दोन्ही कुटुंबांचे गैरसमज दुर करून गुण्यागोविंदाने राहण्याची सूचना केली. तेजा चरडे यांना खात्री पटल्याने सर्वांसमक्ष माफी मागुन जादूटोण्याचा आरोप करणार नसल्याचे शपथपत्र लिहून दिले.