लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मशीनच्या सहाय्याने विना परवानगी खोदकाम करण्यात आल्याने वर्धा पालिकेच्या मालकीच्या जलवाहिनीचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी पालिकेकडे केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता खोदकामासाठी परवानगीच नसल्याचे पुढे आले. त्यामुळे आयडीया सेल्युलर या कंपनीसाठी खोदकाम करून ओएफसी केबल टाकणारी मशीन पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सील केली.शहरात काही दिवसांपासून भूमिअंतर्गत केबल टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत होते. अशाच पद्धतीचे काम शहरातील धंतोली चौक परिसरात सुरू असताना न.प.च्या मालकीची जलवाहिनी फुटली. सदर प्रकार लक्षात येताच नगरसेवक मुन्ना झाडे यांनी याबाबतची तक्रार न.प. प्रशासनाकडे केली. तक्रार प्राप्त होताच न.प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार, लिपीक सुजीत भोसले यांनी आपल्या चमुसह धंतोली परिसर गाठला. यावेळी मशीनच्या सहाय्याने खोदकाम करणाऱ्यांना खोदकामाबाबत परवानगी आहे काय अशी विचारणा केली. त्यावेळी संबंधीतांकडे ओएफसी केबल टाकण्यासाठी शहरात केल्या जात असलेल्या खोदकामाकरिता कुठलीही परवानगी नसल्याचे लक्षात येताच पालिका अधिकारी व कर्मचाºयांनी थेट मशीन सील केली. शिवाय तसा नोटीसही मशीनवर चिटकविला आहे.केबल टाकण्याच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे. खोदाकामानंतर रस्ते बुजविल्या जात नसल्याने अनेक अपघात होत आहे.
खोदकामासाठी वापरणारी मशीन सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:20 PM
मशीनच्या सहाय्याने विना परवानगी खोदकाम करण्यात आल्याने वर्धा पालिकेच्या मालकीच्या जलवाहिनीचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी पालिकेकडे केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता खोदकामासाठी परवानगीच नसल्याचे पुढे आले.
ठळक मुद्देवर्धा पालिकेची कारवाई