सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी समुद्रपूर पोलिसांची कारवाईसमुद्रपूर : होळी या सणाच्या दिवसांत शांतता कायम राहावी म्हणून पोलिसांकडून दारूभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वात शिवणी येथील अवैध दारूभट्ट्यांवर धाड टाकण्यात आली. यात २.३० लाख रुपयांचा सडवा, रसायन व मोहा दारू नष्ट करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शिवणी पारधी बेड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात दोन दारूभट्ट्यांवरील साहित्य जप्त करून माल नष्ट करण्यात आला. यात ३८ प्लास्टिक कॅनमधील ३६०० लिटर मोहा सडवा, २८० लिटर मोहा दारू असा एकूण २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. हे धाडसत्र होळी सणापर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अवचट, मराठे, मते, दीपक राऊत, अमोल खाडे, धुगे, कांबळे, घुसे, जैसिंगपुरे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
अवैध दारूभट्ट्यांवर धाड; २.३० लाखांचा माल नष्ट
By admin | Published: March 07, 2017 1:14 AM