वर्धा : महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून गणण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान आहे. यासाठी शासनाने शिक्षण विभागाला दिलेले ३० निकष पूर्ण करुन शाळांनी प्रगत शाळा म्हणून राज्यात नाव लौकिक करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने हिंमतसिंगका विद्यालय येथे दोन दिवसीय ४२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथोत्सवाचे उद्घाटन नागपूरच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक माधुरी सावरकर यांचे हस्ते झाले. तत्पूर्वी, सकाळी ८ वाजता गं्रथदिंडी काढून शहरातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आली. या दिंडीमध्ये १० शाळेतील दोन हजार विद्यार्थी वेशभुषेत सहभागी झाले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रेखा महाजन, शिक्षणाधिकारी (माध्य.) एन.एम.डुरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) किसन शेेंडे, उपशिक्षणाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक खराबे, आर.जी. पाटील, महेंद्र धर्माळे, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष अजय भोयर, आष्टीचे गट शिक्षणाधिकारी विजय दुबे, अशोक गिद्देलवार, डोळसकर, राठोड विराजमान होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी! वर्धा : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करुन त्यांच्यात वैज्ञानिक गुण तयार करणे विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये आपले साहित्य सादर करताना त्या साहित्याचा समाजाला उपयोग होईल. तसेच विद्यार्थ्यांना बोध घेता येईल. शिक्षकांनी शिकविण्याच्या पद्धतीत बदल करुन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी शिकवण पद्धती असावी, असे माधुरी सावरकर म्हणाल्या. देशाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या देशाने केलेल्या प्रगतीवर अवलंबून असते. २०२० मध्ये भारत देश जगाच्या अग्रस्थानी जाणार आहे. हे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेले स्वप्न विद्यार्थ्यांनी अशा विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमाद्वारे पूर्ण करावे असे प्राचार्य रेखा महाजन म्हणाल्या. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) एन.एम. डुरे यांनी तर आभार शिक्षणाधिकारी (प्राथ.) किसन शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला मेश्राम, कांबळे, इंगोले, शाळेतील विद्यार्थी, जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता गं्रथदिंडी काढून शहरातील प्रमुख मार्गाने फिरविण्यात आली. या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.(जिल्हा प्रतिनिधी)
प्रगत राज्यासाठी शिक्षण क्षेत्राचे योगदान मोठे
By admin | Published: January 21, 2017 12:50 AM