शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

साडेआठ हजार शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 1:41 PM

लॉटरी पद्धतीने होणार निवड : साडेनऊ हजार पंपांचे मिळाले उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी बॅग १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी नऊ हजार ५६० फवारणी पंपांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीपर्यंत १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत कृषी विभागाला मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असून, लॉटरी पद्धतीने निवडीमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे हे तितकेच खरे.

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागण्यात आले होते. या पोर्टलवर अर्ज करण्यात अडचणी आल्याने शेतकऱ्यांना अर्ज करण्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना अखेरची मदत देण्यात आली होती. जिल्ह्यात नऊ हजार ५६० फवारणी पंप वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार ८५० पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले. याकरिता तब्बल १३ हजार २२४ इतके अर्ज प्राप्त झालेत. तर तेलबिया पिकांकरिता तीन हजार ७१० पंपांचे उद्दिष्ट असून, तीन हजार ३७० अर्ज प्राप्त झालेत. पंपांसाठी जिल्ह्यातील १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. लक्षांकाच्या तुलनेत अर्जाची संख्या अधिक असल्याने लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, फवारणीपंप भेटणार केव्हा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

हंगाम अखेरीस, तरी पंप मिळेना ! शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनवर फवारणीसाठी पंप मिळणार आहे. या हंगामात सोयाबीन पिकाचा हंगाम संपत आला आहे तर कापसाचा हंगाम आता सुरू आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आले. लॉटरी पद्धतीने निवडही झाली, तरीदेखील शेतकऱ्यांना पंप मिळालेले नाही. हंगाम संपल्यानंतर पंप मिळणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून केला जात आहे.

सोडतीतून साडेआठ हजार शेतकऱ्यांची निवड • योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठी बॅग १०० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. • याकरिता जिल्ह्याला ९ हजार ५६० पंप वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले. यासाठी तब्बल १६ हजार ५९४ अर्ज प्राप्त झाले आहेत. • उद्दिष्टाच्या तुलनेत दुपटीने अर्ज आल्याने लॉटरी काढण्यात आली. ८ हजार ४६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

"जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी पंप देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला ९ हजार ५६० हजार १५० पंपांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातून १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, पंपांचा अद्याप पुरवठा झालेला नाही. तो लवकरच होणार असून , त्यानंतर वितरणाची प्रक्रिया होणार आहे." - रमेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धा