आॅनलाईन लोकमतवर्धा : जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासक करून आर्वी तालुक्यातील बेढोणा (वाढोणा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कन्या रूपाली ठाकरे हिने तब्बल आठ सुवर्ण पदकांची कमाई केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून प्राविण्य मिळवून नागपूर विभागातून प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला.तालुक्यातील बेढोणा येथील अल्पभूधारक शेतकरी महादेव ठाकरे यांची मुलगी रूपाली हिने नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत एम.ए. मराठी विषयात सुवर्णपदक मिळविले. ती येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचा याबद्दल रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. महादेव ठाकरे यांच्याकडे बेढोणा शिवारात तीन एकर शेतजमीन आहे. रूपाली भाऊ नितीन व आई-वडील शेतात काम करून उदरनिर्वाह करतात. बेढोणा हे ९४० लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. त्यानंतरचे शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. घरातील तसेच शेतीची सर्व कामे करून रूपाली अभ्यास करीत होते. जिद्द व मेहनतीने यश संपादन करून तिने आपले व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.बुधवारी येथील कला वाणिज्य विज्ञान महा.चे प्राचार्य डॉ. हरिभाऊ विरूळकर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मिलिंद पाटील, हिंदी विभागप्रमुख डॉ. श्यामप्रकाश पांडे, मराठी विभागाचे डॉ. सुधाकर भुयार, प्रा. राजेंद्र ढगे, राजेश सोळंकी यांनी तिच्या गावी बेढोणा येथे जाऊन तिचा गौरव केला. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे वृत्त समजताच बेढोणा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत रूपालीचा सत्कार केला. शिवाय गावात फटाक्यांचीही आतषबाजी करण्यात आली. भविष्यात शिक्षणाबाबत रूपालीला कोणतीही अडचण आली तर सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही प्राचार्य डॉ. विरूळकर, पाटील यांनी कुटुबियांना दिली. मुलीचा अभिमान असल्याचे तिच्या आई-वडिलांनी तर मी आता सेटनेट परीक्षेची तयारी करीत आहे. आयपीएस, आयएएस स्पर्धा परीक्षा देत देशसेवा करून आई-बाबांचे स्वप्न साकार करण्याचा मानस असल्याचे रूपाली सांगते.
वर्ध्यातील शेतकऱ्याच्या मुलीने मिळविली आठ सुवर्ण पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:52 AM
जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासक करून आर्वी तालुक्यातील बेढोणा (वाढोणा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कन्या रूपाली ठाकरे हिने तब्बल आठ सुवर्ण पदकांची कमाई केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून प्राविण्य मिळवून नागपूर विभागातून प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातून प्रथमदीक्षांत समारंभात विद्यार्थिनीचा गौरव