वर्धा : उपजिल्हाधिकारी श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचा आदेश मंगळवारी सायंकाळी धडकला. आठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून यात वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनाच निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बदली देण्यात आली आहे.प्रशासकीय बदल्यांची सर्वांनाच प्रतीक्षा होती. यात कुणाची बदली होणार, कोणता अधिकारी बदलणार याबाबत साशंकता होती. हा आदेश अखेर मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी धडकला. यात उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांची उपविभागीय अधिकारी देसाईगंज वडसा जि. गडचिरोली येथे, उपविभागीय अधिकारी वर्धा पदावर आष्टी येथे तहसीलदार पदी कार्यरत स्मीता शिवगौडा पाटील यांची, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम यांची उपजिल्हाधिकारी पेंच प्रकल्प नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्धा पदावर सहआयुक्त भूसुधार आयुक्त कार्यालय नागपूरच्या राजलक्ष्मी शफीक शहा यांची वर्णी लागणार असून गोंदिया येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर उपजिल्हाधिकारी भूसंपादन उर्ध्व वर्धा प्रकल्प वर्धा पदावर बदलून येतील. आर्वीचे उपविभागीय अधिकारी व्ही. आर. ठाकरे यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोंदिया पदावर तर तिरोडा येथील तहसीलदार शुभांगी आंधळे यांची उपविभागीय अधिकारी आर्वी पदावर बदली झाली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
आठ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या
By admin | Published: April 01, 2015 1:45 AM