वर्धा : दिल्लीच्या निजामुद्दीन येथे झालेल्या एका धार्मिक संमेलनात काही व्यक्ती कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे. या संमेलनात वर्धा जिल्ह्यातील आठ जण सहभागी झाले होते. त्यामुळे तेही कोरोना बाधिताच्या संपर्कात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आठपैकी एक व्यक्ती आर्वीत पोहोचला असून सात व्यक्ती अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नसल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीन येथे कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच प्रशासनाकडून आठही जणांचा शोध सुरु केला आहे. त्यातील एकच व्यक्ती आर्वी येथे पोहोचला असून प्रशासनाने त्या व्यक्तीची आणि त्याच्या परिवारातील सदस्यांची आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना कोणतीही बाधा नसून खबरदारी म्हणून त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर सात व्यक्ती अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नसून ते दिल्ली, आग्रा, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाºयांना त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही पण, निजामुद्दीन येथून आलेल्यामुळे प्रशासनाच्याही अडचणी वाढविल्या आहे.
CoronaVirus वर्ध्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीनमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 3:42 PM