शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ईदगाहसह समाज भवनासाठी जिल्हाधिकाºयांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:49 PM

मुस्लीम समाजातील नागरिकांच्या नमाज पठनासाठी व समाज भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीचे निवेदन जामा मस्जीद ट्रस्ट कमेटी व अल रजा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात...

ठळक मुद्देमुस्लीम बांधवांनी पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुस्लीम समाजातील नागरिकांच्या नमाज पठनासाठी व समाज भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीचे निवेदन जामा मस्जीद ट्रस्ट कमेटी व अल रजा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले.स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाला लागून १०० वर्ष जुनी मुस्लीम ईदगाह आहे. यापैकी ७३३२ चौरस फुट जागा कमेटीच्या मालकीची आहे. सदर जागा नमाज पठनासाठी अपुरी पडत आहे. तसेच ७३३८ चौरस फुट पैकी ३८७५ चौरस फुट जागेची रेल्वेने आखणी केली आहे. याबाबत रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची लेखी सूचना देण्यात आली नाही. नमाज पठनासाठी शहर व परिसरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने येतात. त्यांना जागा अपुरी पडत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ईदगाहला लागून असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शिट क्र. २६ मधील भूखंड क्र. ८/१ पैकी १५०० स्केअर फुट जागा ईदगाहसाठी देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.मुस्लीम समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना राबविण्यात आहे. आजही मुस्लीम समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असून त्यांना या योजनांची माहिती नाही. सुसज्य समान भवन नसल्याने मुस्लीम समाज बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, शिट क्र. ३ भूखंड क्र. १२/१ मधील ३० हजार चौरसफुट जागा समाज भवनासाठी देण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जामा मस्जीद कमेटीचे सैय्यद आसिफ अली, काझी झेनुल आबेदीन, अदुल गनी, लईक अहेमद फारूकी, सरदार खॉ बलदार खॉ, काझी रईसुद्दीन, अलरजा संस्थेचे हाजी तौफीक कुरेशी, सैय्यद झैनुल आबेदीन काझी, हाजी सोहराब तुरक, हाजी सलमान अख्तर, असलम अहमद खॉ पठाण, शेख फरीद कुरेशी, इम्रान लांबा, शेख अकमल, शेख अफजल आदींची उपस्थिती होती.