शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
2
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
3
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
4
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
5
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
6
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
7
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
8
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
9
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
10
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
11
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
12
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
13
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
14
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
16
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
17
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
18
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
19
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
20
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

By admin | Published: June 30, 2016 2:10 AM

सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती;

परंपरा अबाधित : तडजोडीत देशमुख १३ आणि गोडे गट ८ जागांवर समाधानीवर्धा : सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती; मात्र माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार व प्रतिस्पर्धी डॉ. शिरीष गोडे यांच्या परिवर्तन गटात अखेरच्या क्षणी तडजोड झाल्याने निवडणूक अविरोध झाली. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा बुधवार अखेरचा दिवस होता. तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाच्या वाट्याला आठ सदस्य देण्याचा निर्णय झाला. यामुळे उर्वरित उमेदवारांचे नामांकन परत घेण्यात आले. सहकार गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील सुरेश देशमुख, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शफात अली, शरद पावडे, सुनील भोगे, पांडुरंग उजवणे, नरेंद्र थोरात, घनश्याम डाखोळे हे उमेदवार अविरोध ठरलेत. तर महिला प्रवर्गात शोभा काळे अविरोध आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून रमेशचंद्र राठी, ज्ञानेश्वर झलके, इतर मागासवर्ग प्रवर्गातून संदीप देशमुख व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून अशोक महाजन हे उमेदवार अविरोध ठरले आहेत. परिवर्तन गटाचे कापूस उत्पादक मतदार संघातील डॉ. शिरीष गोडे, प्रदीप धांदे, भैय्यासाहेब हिवंज, सुभाष कडू, प्रमोद हांडे, तर महिला प्रवर्गातून किरण महल्ले या उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. बिगर कापूस उत्पादक मतदार संघातून मदन भोगे हे अविरोध ठरले आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून राजेंद्र कांबळे यांची अविरोध निवड झाली आहे.१९९४ पासून सुतगिरणीला अविरोध निवडणुकीची परंपरा लाभली आहे. यावेळी मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची अपेक्षा मतदारांनी वर्तविली होती. सहकार आणि परिवर्तन गटातर्फे उमेदवारांचे नामांकन अर्जही दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे ९ हजार ८०० मतदारसंख्या असलेल्या या सुतगिरणीची निवडणूक होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र नामांकन अर्ज परत घेईपर्यंत समेट घडून आणण्यात दोन्ही गट प्रमुखांना यश आल्याने ही निवडणूक टळली. दोन्ही गटातील या तडजोडीत सहकार गटाला १३ आणि परिवर्तन गटाला ८ जागा देण्याचा निर्णय झाला. निवडणुकीत कोणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे १० जुलैला होऊ घातलेली निवडणूक आता होणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)६२ पैकी ४१ जणांचे नामांकन परतबापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीच्या या निवडणुकीत यंदा दोन गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटातून एकूण ६२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नामांकन परत घेण्याचा बुधवार अंतिम दिवस असल्याने ४१ जणांनी अर्ज परत घेतले. यामुळे उर्वरीत नामांकनात १३ देशमुख व आठ गोडे गटाचे सदस्य राहिल्याने ते अविरोध ठरले. एकाचवेळी ४१ नामांकन परत घेण्यात आल्यामुळे या निवडणुकीची अपेक्षित चुरस येथेच संपली. बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अनेकांनी अर्ज परत घेतल्याने अविरोध ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नामांकन परत घेण्याचा आज अंतिम दिवस होता. अविरोध निवडणुकीची घोषणा गुरुवारी होईल.- जे. एम. तलमले, निवडणूक अधिकारी, तथा सहा. उपनिबंधक, वर्धा