आर्वी : नजीकच्या मौजा जांब शिवारातील वीज वितरण कंपनीचे १२ लोखंडी खांबांची चोरी करण्यात आली होती़ या प्रकरणी याच विभागात कंत्राट घेणाऱ्या दोघांना आर्वी पोलिसांनी वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या लेखी तक्रारीवरून अटक केली़ त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता हेमंत केवटे यांनी बुधवारी आर्वी नजिकच्या वीज वितरण कंपनीच्या ११ के.व्ही. तळेगाव गावठाण फिडरच्या मौजा जांब शिवारात उभारणी सुरू असलेले १२ लोखंडी खांब अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून लोखंडी खांब चोरी प्रकरणी याच विभागाचे खासगी कंत्राटदार शैलेश शर्मा (४४) रा. हरदर (मध्यप्रदेश) व सचिन राऊत (३०) रा. गव्हा निपाणी ता. धामणगाव (रेल्वे) या दोघांना अटक केली़ त्यांच्याकडून १२ लोखंडी खांब ८ नग किंमत ९६ हजार रुपयांचा माल तसेच ट्रक्टर जप्त करून त्यांना अटक करण्यात आली़ त्या दोघांविरूद्ध पोलिसांनी ३७९ व भारतीय विद्युत कलम १३८ नुसार गुन्हा दाखल केला़ दोन्ही आरोपींनी तालुक्यातील खडकी आणि शिरपूर रोड येथील विद्युत खांबही खोदून लंपास केल्याची कबुली दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप हिवाळे यांच्या मार्गदर्शनात सुरेंद्र कोहळे, आरीफ खान, प्रवीण चोरे, अमोल आत्राम, कृष्णकांत पांडे व सहकाऱ्यांनी केली़(तालुका प्रतिनिधी)
वीज कंपनीच्या लोखंडी खांब चोरी प्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: June 26, 2014 11:27 PM