शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:25 PM

विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : कृषी उर्जीकरणासाठी १०६ कोटी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. याचाच परिपाक म्हणून एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली. यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.तीन वर्षापूर्वी दुष्काळी विदर्भ आणि मराठवाड्यात कृषीपंपांना वीज जोडणी लवकर दिली जात नव्हती. कारण कृषीपंपांना वीज देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधाच येथे निर्माण करण्यात आल्या नव्हत्या. त्याचा फटका सिंचनाची सुविधा असतानाही केवळ वीज पुरवठा न दिल्यामुळे शेतकºयांना बसत होता. यामुळे शेतकºयांनी स्वत: सिंचन सुविधा निर्माण करूनही शेतकºयांच्या परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नव्हता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर या विषयाकडे गांभिर्याने लक्ष दिले. त्यासाठी २०१५ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खास २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज घोषित केले. यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करुन देत शेतकºयांची महत्वाची समस्या निकाली निघाली.जिल्ह्यात मार्च २०१५ अखेर पर्यंत ४ हजार ४७१ जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी २ हजार ५०३ जोडण्या कृषीपंपांना देण्यात आल्यात. २०१६ मध्ये कृषीपंपाच्या उर्जिकरणासाठी ३१.०६ कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत प्रलंबित असलेल्या १ हजार ९६८ आणि डिसेंबर २०१५ पर्यंत प्राप्त झालेल्या अशा ४ हजार८५० जोडण्या देण्यात आल्या. यातही मार्च २०१६ अखेर पर्यंत प्रलंबीत असलेल्या ३ हजार ६७२ जोडण्या आणि यंदा प्राप्त झालेले अर्ज याला न्याय देण्यासाठी शासनाने ७५ कोटी रूपये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत ४हजार ६०९ वीज जोडण्या देता आल्या. मार्च २०१७ अखेर २३०० जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी आॅगस्ट २०१७ पर्यंत १ हजार ६३० जोडण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित ६७० जोडण्या आणि नवीन ११०० जोडण्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे, असे महावितरणचे अधीक्षक एस.टी. देशपांडे यांनी सांगितले.सिंचन करणे झाले सोपेमागील दहा वर्षांत केवळ ५ हजार वीज जोडण्या दिल्या होत्या. तर या तीन वर्षांत १३ हजार ४९२ कृषीपंपांना वीज जोडण्या देऊन शासनाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे पिकांना सिंचन करणे सहजशक्य होत असल्याचे शेतकरी सांगतात.