अल्लीपूर : वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याच्या कितीही गमजा मारण्यात येत असल्या तरी ग्राहकांना नेहमीच याउलट प्रत्यय येतो. वीज देयक वेळेवर भरले तरी अनेकांना वीज कापण्याची नामुष्की सहन करावी लागते. येथील ग्रामस्थांना तांत्रिक बिघाडामुळे अनेकद रात्र काळोखात घालवावी लागते. कार्यालयात तक्रार करण्यास गेले असता तेथे कर्मचारी राहत नसल्याने ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते.येथील कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी आणि कार्यालयात राहण्याचे वावडे असल्याने समस्या तशीच असते. वीज देयक देण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचा ताफा ग्राहकाकडे वसुलीकरिता धडकतो. मात्र तक्रार देण्याकरिता गेलेल्या ग्राहकाची तक्रार मात्र या तातडीने सोडविली जात नाही. तक्रारीचा निपटारा होत नसल्याने अखेर ग्रामस्थ स्वत:कडील पैसे खर्च करुन खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करुन घेतात. येथील कनिष्ठ अभियंता हे मुख्यालयी राहत नाही. केवळ साप्ताहिक बाजाराच्या दिवशी कार्यालयात हजर असतात. येथील वीज वितरणचे कार्यालय काही अंतरावर असल्याने ग्राहकांकरिता ते गैरसोयीचे ठरते. येथे समस्यांचा डोंगर असल्याने ग्राहकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. भारनियमनाने शेतकरी, गावातील लघु उद्योजक त्रस्त झाले आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा आठ दिवसांपर्यंत वीजपुरवठा बंद असतो. मोठ्या लाईनवरुन बिघाड असल्याची सबब पुढे करीत येथील कर्मचारी वेळकाढूपणा करतात. याची दखल घेत कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी आहे.(वार्ताहर) अनियमित भारनियमनाने पिके करपलीसेलू- तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) आणि परिसरात अनियमित भारनियमन सुरु आहे. यामुळे परिसरातील ओलिताची कामे रखडली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. तीव्र उन्हामुळे पऱ्हाटीचे पीक सुकले असून पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र यात भारनियमनाची शेतकऱ्यांना आडकाठी येत आहे. कृषीपंपाचे देयक नियमित भरत असतानाही या भागातील शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. येथील शेतकरी मंडळाने भारनियमन कमी करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळाने वर्धा कार्यालयात निवेदन सादर दिले असून भारनियमन कमी करण्याची मागणी आहे. यावेळी अभियंता धवड यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी अपूरा कोळसा, अपुरा पाऊस यासह आदी अडचणीमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सांगितले. रात्रीची वीज न देता कृषीपंपासाठी दिवसा वीज दिली जात असल्याची माहिती दिली. भारनियमन बंद करावे, २४ तास विद्युत पुरवठा ठेवावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.(तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांअभावी विद्युत कार्यालय वाऱ्यावर
By admin | Published: October 08, 2014 11:30 PM