अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : वीज वितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना तथा व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला दिल्या जाणाºया वीजबिलाची आर्वी विभागामध्ये प्रभावीपणे वसुली सुरू आहे. नागरिकही देयक वेळीच भरून महावितरणला सहकार्य करीत आहेत.कार्यकारी अभियंत्यांच्या प्लॅनप्रमाणे कारवाई सरू असल्यामुळे सध्या ८० टक्के वसुलीचा टप्पा गाठण्यात आला. वीजचोरी पकडण्यासाठी तयार केलेल्या पथकाकडून धडक कार्यवाही करण्यात येत आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत आर्वी हा अव्वल ठरला आहे.वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आर्वी येथे असून या अंतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा, पुलगाव या पाच उपविभागाचे काम सदर कार्यालयाच्या देखरेखीत चालते. शेतीच्या वापरासाठी दिल्या जाणाºया वीज पुरवठ्याचे प्रमाणे ४५ टक्के तर व्यापारी वापरासाठीचे प्रमाण २५ टक्के आहे. उर्वरीत ३० टक्के वीज पुरवठा घरगुती वापरासाठी दिल्या जातो. या सर्वांचे बजेट काढले तर साधारणत: ५५ टक्के वसुली प्रत्येक महिन्याला होते. त्याची टक्केवारी घरगुती वापरात ८० इतकी आहे. कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी गेल्या ३ वर्षांपासून वीज वसुलीचे नियोजन आखून प्रभावी पद्धतीने वसूली केली. यासाठी प्रत्येक उपविभागाच्या स्वतंत्र मिटींग घेवून वरचेवर आढावा घेतला जात आहे. कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांची मोबाईल यादी तयार करून सर्वांना भ्रमणध्वनीवर संपर्क केल्या जातो. बील भरायच्या अंतम तारखेनंतर अतिरिक्त आकारणीचा सहन करावा लागणार भुर्दंड यामुळे ग्राहकही प्रतिसाद देतात. कर्मचारी घरोघरी फिरून वसुली करतात. कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांच्या नियोजनबद्ध आराखड्याला पाचही उपविभागाने प्रतिसाद दिला. ग्राहकांच्या समस्याही सोडविण्याला प्राधान्य दिल्या जाते. प्रत्येक महिन्याला रिडींग घेवून देयक दिल्या जाते. शासनाच्या यादीत आर्वी विभाग वसुलीत जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगण्यात येते. उर्जामंत्री बावनकुळे यांनी कार्यकारी अभियंता गायकवाड यांचा गौरव केला. मुख्यालयी राहून सर्व प्रकरणे निकााली काढण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. नागरिकांकडून येणारी प्रत्येक तक्रार झटपट निकाली काढून शेतकºयांसह नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.प्रत्येक तक्रारकर्त्याचे केले जाते समाधानआर्वी विभागात येणाºया आष्टी(श.), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील प्रत्येक घर प्रकाशमान करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. परिसरातील शेतकºयांसह नागरिकांची येणारी प्रत्येक तक्रार निकाली काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांकडून केला जात आहे. नागरिकही देयक वेळीच भरून महावितरणला सहकार्य करतात.
वीज देयक वसुलीत आर्वी विभाग जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:01 PM
वीज वितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना तथा व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला दिल्या जाणाºया वीजबिलाची आर्वी विभागामध्ये प्रभावीपणे वसुली सुरू आहे.
ठळक मुद्दे८० टक्के उद्दिष्ट पूर्ण : वीज चोरी पकडण्यातही अग्रेसर