लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : कंत्राटी मदतनिस विजतंत्री पोलवर चढताना पोलवरील सुरक्षा ताराला आलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडलीस आली. ही घटना वडगाव (सावंगी) येथे घडली. जोपर्यंत महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येत नाही व मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देत नाही तोपर्यंत घटनास्थळावरून मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.गणपत पंढरी अवघडे (३६) रा. साखरा हा साठोणे ठेकेदार यांचेकडे कंत्राटी मदतनिस विजतंत्रीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी सहायक अभियंता गणवीर यांनी फोनवरून माहिती देत हळद्या गावठानवर ११ के. व्ही. लाईनवर फॉल्ट आहे, असे सांगून जायला सांगितले. तेव्हा मृतक गणपत हा एकटाच होता. वडगाववरून तो येत असताना ती लाईन बंद दिसली. तेव्हा रोडवर गाडी ठेवून पोल पाहत असताना एका पोलवर इन्शुलन तुटून तार पोलवर पडलेला दिसला. मात्र, त्याचा विद्युत प्रवाह अर्थिंग तारासोबत पोलच्या मधोमध गुंडाळून असलेल्या सुरक्षा तारामध्ये आला होता. हा पोली चढायला गेल्याबरोबर त्याला विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. महावितरच्या चुकीमुळेच गणपतचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. चर्चेअंती मृतदेह उचलण्यात आला.
कंत्राटी विजतंत्रीचा विद्युत धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 10:34 PM
कंत्राटी मदतनिस विजतंत्री पोलवर चढताना पोलवरील सुरक्षा ताराला आलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडलीस आली. ही घटना वडगाव (सावंगी) येथे घडली.
ठळक मुद्देदुरूस्ती करताना बसला जबर झटका : मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी