वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात महाविद्यालयासह अन्य अभियांत्रिकीच्या २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. तुषार सोमनाथे, प्रा. राहुल बोंबटकर, प्रा. योगेश इखे, प्रा. हर्षल कुत्तरमारे, प्रा. प्रशिंग कांबले, प्रा. मेहर, प्रा. प्रशांत शेंडे आणि प्रा. प्रविण जारोंदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सोमनथे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी आहे. मात्र त्याकरिता अंगीभुत कौशल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. या गुणवत्तेचा विकास होण्याकरिता याप्रकारच्या कार्यशाळात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अंकगणित, स्पोकन इंग्लीश, लॉजिकल रिझनिंग, मुलाखत, गटचर्चा, इंटरपर्सनल स्किल या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील आयटी, सीएसई, ईटीसी, ईलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल व ईलेक्ट्रीकल शाखेच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सदर कॅम्पस ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांचे प्रिअसेसमेंट टेस्ट तसेच मॉक इन्टरव्यु घेण्यात आले. विद्यार्थी तसेच पालकांनी महाविद्यालयात होणाऱ्या या उपक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन उंटवाले, ईलेक्ट्रीकल विभाग प्रमुख प्रा. धनंजय ईखार, ईलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. रश्मी पांढरे, सी़ एस. विभाग प्रमुख प्रा. सचिन बलविर, आय. टी. विभाग प्रमुख प्रा. गजानन तिखे यासह आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
रोजगारविषयक मार्गदर्शन
By admin | Published: June 25, 2014 11:56 PM