ऑनलाईन लोकमत हिंगणघाट : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या दुसºया दिवशी शनिवारी अतिक्रमण विरोधी पथकांद्वारे शहरातील अतिक्रमणाचे नामोनिशान मिटविण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असून सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा चंगच बांधला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान होवून रोजगार बंद करण्याची पाळी काही जणांवर आली आहे.नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे आजही कारवाई जोरात सुरू असून डॉ. आंबेडकर चौरस्ताच्या बाजूने असलेल्या दुकांनाची जेसीबीने मोडतोड केली. पडलेल्या साहित्याची तुटलेल्या मोडलेल्या ठेल्यांची दृष्ये दिसत होती. तेथील दुकाने खाली झाल्याने तेथील मोठी जागा आता वाहतुकीसाठी उपलब्ध होवू शकते, असा प्रयत्न कदाचित पालिकेचा असू शकतो. आज रूबा चौकातही अतिक्रमणातील दुकाने, ठेल्यांची उचलबांगडी झाली असून काहींचे दुकाने तुटल्या फुटल्याने नुकसानही झाल्याची अनेकांकडून ओरड सुरू आहे.
दुसऱ्या दिवशीही काढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:37 AM
ऑनलाईन लोकमत हिंगणघाट : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या दुसºया दिवशी शनिवारी अतिक्रमण विरोधी पथकांद्वारे शहरातील अतिक्रमणाचे नामोनिशान मिटविण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असून सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा चंगच बांधला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान होवून रोजगार बंद करण्याची पाळी काही जणांवर आली आहे.नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे आजही कारवाई जोरात सुरू असून डॉ. ...
ठळक मुद्देअनेकांच्या साहित्याची तोडफोड