लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील मदनसिंग चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठ्यातील शेत उपयोगी साहित्य व इतर साहित्य जळून कोळसा झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय नुकसान भरपाई बाबतचा प्रस्ताव त्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे.प्राप्त माहितीनुसार, आष्टी परिसरातच शेतकरी मदनसिंग चव्हाण यांचे शेत आहे. त्यांनी शेत उपयोगी साहित्य व इतर साहित्य ठेवण्यासाठी शेतातच गोठा तयार केला; पण शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीचे एकमेकांशी घर्षण होऊन आगीची ठिणगी पडली. शिवाय विद्युत तारही तुटली. सुरूवातीला अल्पप्रमाणात असलेल्या आगीने बघता-बघता संपूर्ण गोठ्याला आणि गोठ्यातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. या आगीत गोठ्यातील गुरांसाठी असलेला चारा, ढेप, सरकी, शेतीची अवजार, सिंचनाची साहित्य पाईप जळून कोळसा झाले.घटनेची माहिती मिळताच तलाठी राजू घाडगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आपला अहवाल त्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकºयाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.अग्निशमन बंब ठरला पांढरा हत्तीगोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला त्याची माहिती देण्यात आली. परंतु, अग्निशमनबंबात पाणी नसल्याने व तो वेळीच घटनास्थळी पोहाचू न शकल्याने आगीनेही गोठ्यातील संपूर्ण साहित्याला आपल्या कवेत घेतले होते. आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर अग्निशमनबंब वेळीच घटनास्थळी दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या घटनेदरम्यान नगरपंचायत प्रशासनाचा अग्निशमन विभाग किती दक्ष आहे, याची प्रचितीच येत आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:01 AM
येथील मदनसिंग चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठ्यातील शेत उपयोगी साहित्य व इतर साहित्य जळून कोळसा झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
ठळक मुद्देदीड लाखाचे नुकसान : शेतकऱ्याच्या अडचणीत भर