कसबा मित्रमंडळ अष्टविनायक मंडळ आणि सनराईज इंग्लिश स्कूलचा पुढाकारआर्वी : गत १८ आठवड्यांपासून आर्वी शहरात पर्यावरणपुरक नो व्हेईकल डे हा सामाजिक उपक्रम सातत्याने नो व्हेईकल डे कृती समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने सुरू आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी आर्वीतील जुना कसबा परिसरात कसबा मित्रमंडळ आणि सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहकार्याने नो व्हेईकल डे साजरा करण्यात आला.सकाळी ८ वाजता स्थानिक पावडे हॉस्पिटल येथून नो व्हेईकल डे कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अरूण पावडे यांच्या नेतृत्वात रॅलीची सुरूवात करण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, गांधी चौक, मारोती वॉर्ड आदी मार्गावरून नेण्यात आली. आर्वीतील श्रीराम शाळा येथून ही रॅली, कन्नमवार शाळा परिसरात पोहोचली. त्यानंतर कसबा परिसरात सनराईज इंग्लिश स्कूलच्या पुढाकाराने रॅलीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी डॉ. पावडे, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. नंदकिशोर कोल्हे, लॉयन्सचे अध्यक्ष डॉ. रिपल राणे, पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ भाऊसाहेब ठाकूर, नंदकिशोर दीक्षित उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाची माहिती देत, इतर सामाजिक संघटनांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक कैलास लोखंडे, संचालन प्रा. प्रशांत सव्वालाखे तर आभार प्रशांत कांडलकर यांनी केले. या रॅलीत राधास्वामी, निरंकारी, लॉयन्स, रोटरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, आर्वी तालुका पत्रकार संघाचे प्रा. अभय दर्भे, उदय, वाजपेयी, डॉ. प्रकाश राठी, राजेश सोळंकी, सुरेंद्र डाफ, बबलू ठाकूर, विनय डोळे, माजी न. प. प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पोजगे, सनराईज इंग्लिश स्कूलचे गजानन सोनटक्के, प्रशांत कांडलकर, अविनाश कदम, नरंद्र रावत, ओमप्रकाश मेघवानी, अनिल भट्ट, प्रकाश देशमुख, शंकर आगरकर, रेणूका सोयल ग्रृप, कपील ठाकूर, अष्टविनायक मंडळ व इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रसंगी नो व्हेईकल डे चा पुरस्कार करणाऱ्या ज्ञानेश्वर पोजगे यांचा कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
‘नो व्हेईकल डे’ द्वारे पर्यावरण जनजागृती
By admin | Published: March 26, 2016 2:01 AM