लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मदना शिवारातील युवराज पुनवटकर यांच्या शेतातील विहिरीत या प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आले असून छगन उर्फ बंटी प्रल्हाद (२४) आणि रजनी दिलीप तुमडाम (२१) दोन्ही रा. मदना, असे मृतकांची नावे असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.रजनी आणि बंटी हे दोघे एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. त्यांनी विवाह करण्याचा शपती घेतल्या. मात्र, घरच्यांना यांच्यातील प्रेमाची माहिती नसल्याने दुसरीकडे लग्न जुळवून साखरपुडा उरकविण्यात आला. तेव्हापासून दोघेही आपल्या प्रेमाचे काय या विवंचनेत होते. त्यांनी आपले दु:ख लपवून ठेवले. रात्री एक वाजताच्या सुमारास घरातील मंडळी झोपून असताना पुनवटकर यांचे शेत गाठले. तेथे त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. बंटी व रजनी घरी नसल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांकडून शोधाशोध सुरू करण्यात आली. परंतु, रात्री त्याचा शोध लागला नाही. दरम्यान बुधवारी सकाळी सदर दोघांचे मृतदेह पुनवटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आले. या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलीस पाटील अमित धोपटे यांच्याकडून माहिती मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, जमादार कामडी, प्रेमराज बावणे, मनिष मसराम यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय दोन्ही मृतदेय उत्तरिय तपासणीसाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या. सदर प्रकरणी खरांगणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.‘रजनी’ बीएससी नर्सिंग झालेली तर ‘बंटी’ रामपचा कर्मचारीसुमारे तीन वर्षांपूर्वी रजनी आणि बंटी यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतरण झाले. तेव्हापासून ते एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत होते. मृतक रजनी हिचे शिक्षण बीएससी नर्सिंग झाले असून मृतक बंटी हा राज्य परिवहन महामंडाळाचा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. एक महिन्यानंतर रजनी हिचा साखरपुडा झालेल्या मुलासोबत विवाह होणार होता, हे विशेष.सिंचनादरम्यान विहिरीने तळ गाठल्याने प्रकार आला उजेडातशेतकरी पुनवटकर यांनी त्यांच्या शेतात गव्हाची लागवड केली आहे. बुधवारी गव्हाला विहिरीतील पाणी देण्याचे काम सुरू असताना काही वेळाने विहिरीने तळ गाठला. याच दरम्यान शेतकºयाने विहिरीत डोकाहून पाहिले असता विहिरीत दोन मृतदेह असल्याचे पुढे आले. याची माहिती शेतकºयाने ग्रामस्थांना देत पोलिसांना दिली.
प्रेमभंगातून युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:05 AM
आई-वडिलांनी आपल्या मर्जीच्या विरोधात दुसरीकडे लग्न जुळवले. तसेच साखरपुड्याचा कार्यक्रमही उरकविला. यामुळे प्रेमात अपयश आल्याची खंत मनात ठेऊन एका प्रेमी युगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
ठळक मुद्देमदना शिवारातील घटना : शेतातील विहिरीत घेतली दोघांनी उडी, परिसरात खळबळ