शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

अर्धशतकानंतरही बोरधरणाचा उद्देश अपूर्णच

By admin | Published: May 31, 2015 1:30 AM

सेलू तालुक्यात हरितक्रांती करण्याकरिता बोर धरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे सुंदर असे बालोद्यानही उभारण्यात आले.

धरणाला झाली ५० वर्षे पूर्ण : १० वर्षांपासून रंगरंगोटी नाही; उद्यानही अडगळीतरितेश वालदे बोरधरणसेलू तालुक्यात हरितक्रांती करण्याकरिता बोर धरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे सुंदर असे बालोद्यानही उभारण्यात आले. नुकतेच या धरणाने ५१ व्या वर्षात पर्दापण केले. पण हरितक्रांतीचे स्वप्न मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच उद्यानाचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बोरधरणाचा मूळ उद्देश आजही अपूर्र्णच आहे.तब्बल ५५ वर्षापूर्वी बोरधरण प्रकल्पाला सुरूवात करण्यात आली २०१५ पासून या प्रकल्पाने ५१ व्या वर्षात पदार्पण झाले. अर्धशतक पाहणाऱ्या या प्रकल्पावर अनेकांच्या अपेक्षा होत्या. या प्रकल्पातून निघालेल्या कालव्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून हरितक्रांतीचे स्वप्न दाखविणाऱ्या या प्रकल्पा उद्देश अद्यापही पूर्ण झालेला नाही. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर झाडाझुडपांनी वेढलेल्या उंच टेकड्याच्या मधोमध १९४६ ला ३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धरण बांधण्यात आले. या धरणाला यशवंत धरण म्हणून ओळखण्यात येते. धरणाचे क्षेत्रफळ १ हजार ४५५ हेक्टर असून धरणापासून २१ कि़मी लांबीचा मुख्य कालवा आहे. कालव्याच्या डागडूजीकरिता व दुरूस्तीकरिता शासनाकडून मोठा निधी येतो. परंतु कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे धरण व कालव्याची अवस्था बिकट झाली आहे. मागील ५ वर्ष या क्षेत्राचे आमदार हेच पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष असतानासुद्धा धरणाच्या सुशोभिकरणाकडे दुर्लक्ष झाले. प्रेक्षणीय स्थळ असलेल्या बोधरणाचा विकास करणे निंतात गरजेचे झाले आहे. पाणी असूनही सिंचनाच्या नियोजनाचा अभावतहान लागलेला व्यक्ती पाण्याची मागणी करतो तेव्हा त्याला पाणी देणे गरजेचे असते. पण येथील पाटबंधारे विभागाची तऱ्हा वेगळीच आहे. शेतकरी पाण्याची मागणी करतात तेव्हा पाणी सोडल्या जात नाही. सोडलेले पाणी पिकांना मिळण्याऐवजी कालव्यांची दुरवस्था झाल्याने पिकांची नासाडीच जास्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.अनेक ठिकाणी धरणाच्या कालव्याला तडे गेले आहेत. त्यामुळे सिंचन व्यवस्थित होत नसून पाण्याचा अपव्यवच जास्त होत असतो. संरक्षण भिंतीवर झुडपांचा विळखा धरणाच्या संरक्षण भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी उगवली असून अनेक वर्ष ती तोडण्यात न आल्याने या झाडांच्या मुळ्यांपासून धरणाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक्क़ वर्षांपासून बोर धरणाच्या सरंक्षण भिंतीवरील झाडांची व झुडपींची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरणाला धोका वाढला असून धरण परिसरात अवकळा पसरली आहे. या झाडांची सफाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. बालोद्योन झाले ओसाड मागील १० वर्षापासून बालोद्यान बंद अवस्थेत आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. बसण्याची आसने मोडकळीस आली आहे. बगीच्यात गवत व लहान झुडपी वाढल्या आहेत. त्यामुळे एकेकाळची पर्यटकांची गर्दी आता येथे पहावयास मिळत नाही. पाण्याची पातळी दर्शविणारे आकडेही मिटलेलेबोर धरणाची मागील १० वर्षापासून रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. धरणाच्या दरवाज्यावरील भिंजीवरील व पाण्याची पातळी दर्शवित असलेल्या पाटीवरील आकडे मिटलेल्या अवस्थेत दिसून येतात. काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. तरीही अधिकारी निंद्रावस्थेत असल्याचे येथील परिस्थितीवरून पहावयास मिळत आहे. आहे. धरणाच्या परिसरात प्रेमी युगुलांचा वावरधरणाच्या परिसरात मुक्त संचार करणारे प्रेमी युगल येथे नेहमीच वाट्टेल तसे वागताना दिसतात. अनेकदा भिंतीवरून अनेक तरूण तरूणी धरणाच्या परिसरात उतरतात.पाण्याशी त्यांचा हा खेळ कधीकधी मृत्यूला निमंत्रण देतो. अनेक दा अश्या घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. १५ वर्षापूर्वी बालोद्यानाच्या पिंजऱ्यात असायचे प्राणीयेथील बालोद्यानात प्राणी संग्रहालयही होते. जवळपास अर्धा एकरातील जागेत तारांच्या मोठ्या कुंपनामध्ये पिंजऱ्यात हरिण, सांबर, निलगाय, मोर, ससा असे बरचे प्राणी पहाण्यास मिळत होते. शाळेतील लहान लहान मुलांच्या सहली येथे आधी नेह,ई यायच्या. या बालोद्यानात शिक्षकांसोबत डबा पार्टीचा आनंद विद्यार्थी घेत असत. तेव्हा सदर बालोद्यान हे तालुक्याचे वैभव होते. परंतु आता शाळेची सहल येथे फिरकतही नाही.