पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा उशिरा का होई ना पण कपाशीची लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी पावसाच्या सरी झाल्याने बीजही अंकुरले. परंतु, सध्या कपाशी पिकावर उडद्या कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.मागील दोन वर्षांमध्ये सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाल्याने तालुक्यातील शेतकºयांनी यंदाच्या हंगामात कपाशी पिकाची लागवड करण्यावर भर दिला. काही शेतकºयांनी थोड्या प्रमाणात धूळ पेरणीही केली. तर काही कपाशी उत्पादकांनी उशीराने का होई ना पण कपाशीची लागवड करण्यालाच प्राधान्य दिल्याने यंदा कपाशीचा पेरा वाढल्याचे बोलले जात आहे; पण सध्या हे पीक उडद्या या किटकामुळे धोक्यात आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तालुक्यातील निबोली, सर्कसपूर, टोणा, देऊरवाडा, इठलापूर, राजापूर, कर्माबाद, नांदपूर, टाकरखेडा, लाडेगाव, शिरपूर, एकलास, जळगाव या परिसरातील कपाशी पिकावर उडद्या कीटकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील दोन वर्ष गुलाबी बोंडअळीने तर यंदा बियाणे अंकुरल्याबरोबर उडद्या किटकाचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.अंकुरलेले रोपट्याचे होतेय नुकसानउडद्या हा कीटक पेरणी झाल्यानंतर कपासीचे अंकुरलेले आणि कोवळे रोपटे जमिनीतून बाहेर निघताच त्याचे अंकुराच्या दांडीवर हमला करतात. शिवाय अंकुराचे खोड कापून मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सदर कीटक हे जमिनीत या वर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे शेतकरी सांगतात. हा कीटक जमिनीतून बाहेर असलेले झाडाची पाने सुद्धा खाऊन कपासीच्या पिकाचे नुकसान करीत असल्याचेही शेतकरी सांगतात.तालुक्यातील अनेक गावातील शेतकºयांनी फार मोठ्या प्रमाणावर कपासीची लागवड केली आहे; पण या पिकावर उडद्या नावाच्या कीटकाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने निम्म्यापेक्षा जास्त पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तर सरकारने हवालदील शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी.- सुचिता कदम, जि.प. सदस्य.कपासीवरील उडद्या कीटकाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्लोरोपारिफॉस या औषधाची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात २५ मि.ली. मिसळून करावी. असे केल्यास सदर कीटकावर नियंत्रण मिळविता येते. सदर औषधी ही मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आर्वी तसेच खरांगणा येथे अनुदानित तत्त्वावर उपलब्ध आहे.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.
आर्वीत कपाशीवर उडद्या कीटकाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:36 PM
पुरूषोत्तम नागपुरे । लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा उशिरा का होई ना पण कपाशीची लागवड ...
ठळक मुद्देशेतकऱ्याच्या अडचणीत भर : कृषी विभागाच्या मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदिल