वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आलेल्या माजी सैनिकांनी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी निदर्शने करीत ‘वन रँक वन पेन्शन’ला विरोध दर्शवित विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, तसेच प्रधानमंत्रींना पाठविले.
वन रँक वन पेन्शन-२ मधील विसंगती दूर करण्यात यावी, शिवाय सैन्य अधिकारी आणि जेसीओ जवानांना समान हिस्सा देण्यात यावा, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना भारतीय माजी सैनिक संघटनेचे सचिव भानुदास सोमनाथे, अरुण हस्ती, विजय बुटे, विवेक ठाकरे, विलास चांभारे, गजानन पेटकर, रवींद्र चतुरकर, सुनील चावरे, शालिक पाटील, देवानंद बोरकर, विनोद वांढरे, दिवाकर आसटकर, दिलीप गव्हाणे आदींची उपस्थिती होती.