लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून कमी केले आहे. हा कुणबी जातीवर आघात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करीत या जातीला क्रिमिलेअरमधून वगळण्याची मागणी केली आहे. सदर निवदेन वर्धा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या शिष्टमंडळाने समीर देशमुख यांच्या नेतृत्वात सादर केले.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाच्या इतर मागासवर्ग यादीतील ग्रामस्तरावर ज्या जातींचा पारंपारिक व्यवसाय शेती असा आहे व जे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आहेत व स्वत: शेती अथवा शेतमजुरी करीत असून अन्य इतर व्यवसाय करीत नाही. अशा व्यक्तींना क्रिमिलेअरची अट लागू होणार नाही, अशी शिफारस केली आहे; परंतु सदर आयोगाने कुणबी मराठा या जातीला क्रिमिलेअर तत्व लागू होणाºया जातींच्या यादींमध्ये समाविष्ट केल्याचे अहवालात दिसत आहे.कुणबी-मराठा ही जात राजकारणामध्ये प्रगत असली तरीही गत १५ वर्षांत केवळ शेतीवर अवलंबून आहे. यात शेतकºयांनी आत्महत्यांचा कळस गाठलेला आहे. त्यामुळे कुणबी मराठा समाजामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. १९९०-९१ साली महाराष्ट्रात पिकाखालील जमीन खातेदारांची संख्या ९४ लाख ७० हजार इतकी होती. २०१३-१४ ला ती संख्या १ कोटी ३६ लाख ९८ हजार इतकी झाली. याचाच अर्थ असा की, जमीन मालकी असणाºयास खातेदारांची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढलेली आहे. परंतु पिकाखालील क्षेत्र १२.५० लाख हेक्टर ने कमी झालेले आहे. यात अल्पभूधारकांचा मोठा वर्ग आहे. भविष्यातही अल्पभूधारकांची संख्या अधिक होणार आहे. वंशपरंपरागत शेती व्यवसाय करणाºया कुणबी, मराठा समाजाला वगळल्याने या जातीतील लोकांमध्ये त्यांचेवर अन्याय झाल्याची भावना प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे कुणबी मराठा जातीला क्रिमिलेअरच्या तत्वामधून सूट देण्याची शिफारस शासनाकडे करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी जि.प. सदस्य संजय कामनापुरे, अंबादास वानखेडे, रायुकाँ जिल्हाध्यक्ष संदीप किटे, पं.स. सदस्य प्रफुल मोरे, राविकाँ अध्यक्ष राहुल घोडे, बाबुजी ढगे, नयन खंगार, संकेत निस्ताने, बाबाराव खोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:08 AM
मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून कमी केले आहे. हा कुणबी जातीवर आघात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन .....
ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शासनाला निवेदन