शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

प्रकल्प कार्यालय कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:28 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा येथील स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालयाची मागणी पूर्ण केली असून ते कार्यालय तत्काळ कार्यान्वित करावे, यासह महत्त्वाच्या अकरा मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

ठळक मुद्देपंकज भोयर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा येथील स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालयाची मागणी पूर्ण केली असून ते कार्यालय तत्काळ कार्यान्वित करावे, यासह महत्त्वाच्या अकरा मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. महाजनादेश यात्रेदरम्यानच्या वर्धा येथील सभेदरम्यान या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचीही विनंती केली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५० कोटी रुपयांची मदत करुन रिझर्व बँक आॅफ इंडियाकडून रद्द झालेला परवाना प्राप्त करुन दिला. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज दिले जात नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेची शाखा तातडीने सुरु करावी. रामनगर लीजप्रकरण १९९१ पासून प्रलंबित होते. त्यांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया पार पडली. मात्र, अद्यापही मालकी हक्क मिळाला नाही. त्यामुळे भूखंडधारकांना मालकी हक्काने पट्टे वाटप करावे. सेवाग्राम विकास आराखड्यात वरुड व पवनार या ग्रामपंचायतींचा समावेश केल्याने विकास होत आहे.तसेच नजिकच्या दहा ग्रामपंचायतींचाही आराखड्यात समावेश करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.शहरालगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो.या पाण्याचे देयक हे शहरी दराने आकारले जात आहे. ते देयक ग्रामीण भागाच्या दरानुसार देण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यात जमा व्हावे आणि त्यांना चतुर्थ श्रेणी लागू करावी. शहरासह लगतच्या गावातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता महाकाळीच्या धाम प्रकल्पातून येळाकेळीपर्यंत पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा करण्याची मान्यता द्यावी.अमृत योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सार णयोजनेच्या कामात नियोजनाचा अभाव असल्याने नागरिंकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरापूर्वीच या योजनेच्या खड्डयात पडल्याने बालकाचा करुण अंत झाला. त्यामुळे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता उत्कृष्ट अधिकारी व यंत्रणेची नियुक्ती करावी. इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरिता ५१ हजार रुपयाचे अनुदान आणि कामगारांकरिता स्वतंत्र रुग्णालय सुरु करावे आणि येणाºया कालावधीत वर्धेपर्यंत नागपूर मेट्रोचे विस्तारीकरण करावे, या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत सकारात्मकताही दर्शविली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaj Bhoyarपंकज भोयर