शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कामगारांचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:33 PM

महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक, स्वच्छता व धोबीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचा आरोप : मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीत कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालविल्या जात असलेल्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक, स्वच्छता व धोबीकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे. याला सोसायटीचे पदाधिकारी व कंत्राटदार जबाबदार असून सात दिवसात मागण्या मान्य कराव्या अन्यथा बेमुदत संप केल्या जाईल, असा इशारा संभाजी बिग्रेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी पत्रपरिषदेत दिला.सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीत मागील दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक, स्वच्छता व धोबीकाम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता अत्पल्प वेतन देऊन त्यांचे शोषण केले जात आहे. कायद्यानुसार सुरक्षा रक्षकांना १२ हजार रुपयापेक्षा जास्त तर स्वच्छता कर्मचाºयांना ११ हजार ८५८ व धोबी कर्मचाºयांना ९ हजार ६२४ रुपये वेतन देणे बंधनकारक आहे. परंतु, हेल्थ सोसायटीने केवळ दहा ते पंधराच कर्मचारी कायस्वरुपी दाखवून इतर कर्मचाºयांना कंत्राटी पद्धतीवर अत्यल्प वेतनात राबवून घेतले जात आहे. या कामगारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर कामावरुन काढून टाकण्याची किंवा कंत्राटदाराकडून पाहून घेण्याची धमकी दिली जात असल्याने कर्मचारी निमुटपणे त्रास सहन करित आहे. या कर्मचाऱ्यांबाबत सोसायटीला विचारले तर ते आमचे कर्मचारी नाही कंत्राटदाराचे कर्मचारी आहे; असे सांगितले. त्यामुळे त्यांना न्याय मिळून देण्याकरिता संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मागण्यांसदर्भात सोसायटी व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाईल.सोसायटीने सात दिवसाच्या आत कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर बेमुदत संप केल्या जाईल, असेही उमाळे यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. मंगेश घुंगरुड यांची उपस्थिती होती. या संदर्भात कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ.बी.एस.गर्ग यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.सोसायटी व कंत्राटदारांची दडपशाहीसेवाग्राम हेल्थ सोसायटीतील कामगारांचा कंत्राट मेहरे व सवाई नामक कंत्राटदारांना दिला असून कंत्राटदार आणि सोसायटीच्या पदाधिकाºयांच्या संगणमताने दडपशाही धोरण अवलंबीले जात आहे. त्यांना कामगार अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याने कामगारांची अडचण वाढली आहे. कामगारांच्या मागणीसंदर्भात कंत्राटदारांशी चर्चा करण्यासाठी गेल्याने कंत्राटदाराने सेवाग्राम पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली. त्यावर पोलिसांनीही विचार न करता सहा गुन्हे दाखल केले. यावरुन राजकीय दबावतंत्र आणि दडपशाही धोरणामुळेच कामगारांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे सोसायटी आणि कंत्राटदाराविरुध्दही फसवणुुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबतच कंत्राटदाराविरुद्ध कामगार न्यायालयात तक्रार करुन परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहे. सोबतच येणाºया हिवाळी अधिवेशनात एका आमदारांमार्फत तारंकित प्रश्नही लावणार असल्याचे तुषार उमाळे यांनी सांगितले.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड