अल्लीपूर : वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळी गैरहजर राहून वर्ष वाया घालविणे योग्य नाही. हीच बाब लक्षात घेत एक नवरी लग्नमंडपातून थेट परीक्षा केंदावर अवतरली. तिला पाहून विद्यार्थी तथा शिक्षकही अचंबितच झाले. शनिवारी इयत्ता बारावीचा समाजशास्त्राचा पेपर होता. येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्र क्र. ५३१ वर रवीना शंकरराव खोंड ही परीक्षार्थी होती. त्याच दिवशी तिचा विवाह ठरला असल्याने पेपर देता येईल की नाही, याची शाश्वती नव्हती; पण रवीनाने लग्न लागल्यानंतर नववधूच्या वेषातच परीक्षा केंद्र गाठत पेपर दिला. चक्क नवरी पेपर देण्यास आल्याने सर्वांना आश्चर्य झाले.(वार्ताहर)
लग्नमंडपातून नवरी थेट परीक्षा केंद्रावर
By admin | Published: March 19, 2017 12:58 AM