लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्राचे जैविक वैशिष्ट्य असलेल्या व गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस अधिवासाचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने सारस अधिवास सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. वर्धा-गोंदिया-वर्धा अशी ६०० किलोमीटरची परिक्रमा बहारच्या पक्षीमित्र सायकलस्वारांनी नुकतीच पूर्ण केली. या सायकलस्वारात बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सचिव दिलीप वीरखडे, पक्षीमित्र दीपक गुढेकर व दर्शन दुधाने यांचा समावेश होता.एकेकाळी महाराष्ट्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सारस पक्ष्यांच्या संख्येत वृद्धी झालेली असून सारस पक्षी संरक्षण व संवर्धनाकरिता ज्या निसर्गसंस्थांनी, गावकऱ्यांनी व पक्षीमित्रांनी प्रयत्न केल, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पक्षीमित्र विदर्भ विभागाद्वारे या सायकल परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय सारस पक्ष्यांच्या अधिवासाचे अध्ययन करणे व पक्षी निरीक्षणाला जाताना पक्षीमित्रांनी सायकलीचा वापर करावा, हा संदेश देण्याच्या उद्देशाने ही परिक्रमा आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्र पक्षीमित्र विदर्भ विभागाचे समन्वयक दिलीप वीरखडे यांनी सांगितले.ही सायकल परिक्रमा गोंदिया जिल्ह्यातील सारस अधिवासात फिरली. प्रारंभी यावेळी गोंदियाचे मानद वन्यजीवरक्षक मुकुंद धुर्वे यांनी हिरवी झेंडी दाखविली. परिक्रमेदरम्यान आढळलेल्या सारस पक्ष्यांचे निरीक्षण करीत व अधिवासाच्या नोंदी घेत गावकºयांशी संवाद साधण्यात आला. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर व मुकुंद धुर्वे यांनी सारस संवर्धनाकरिता केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ईश्वरदयाल गौतम या पक्षीमित्र शिक्षकाने अनुभवकथन केले. या परिक्रमेत महाराष्ट्र पक्षीमित्र विदर्भ विभाग, बहार नेचर फाऊंडेशन, इको-प्रो चंद्रपूर, गोंदिया निसर्ग मंडळ व सेवा संस्था यांचा समावेश होता. या परिक्रमेत इको-प्रोचे सचिन धोत्रे, स्वप्निल रागीट, प्रवीण मुरकुटे यांच्यासह अशोक पडोळे, राहुल भावे, रतिराम क्षीरसागर, बबलू चुटे, बंटी शर्मा, शशांक लाडेकर, उमेंद्र भिलावे व लाडे सहभागी झालेत.या यशस्वी परिक्रमेकरिता महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे, डॉ. गजानन वाघ, वर्ध्याचे मानद वन्यजीवरक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे जयंत सबाने, राजदीप राठोड, सुनंदा वानखडे यांच्यासह पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग संवर्धन करणाºया अनेक संस्थांच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
बहारच्या पक्षीमित्रांनी केला ६०० किलोमीटर सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:41 PM
महाराष्ट्राचे जैविक वैशिष्ट्य असलेल्या व गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस अधिवासाचे अध्ययन करण्याच्या उद्देशाने सारस अधिवास सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. वर्धा-गोंदिया-वर्धा अशी ६०० किलोमीटरची परिक्रमा बहारच्या पक्षीमित्र सायकलस्वारांनी नुकतीच पूर्ण केली.
ठळक मुद्देसारस अधिवास अध्ययन : वर्धा- गोंदिया-वर्धा परिक्रमा