लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : विकासाबाबत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. गावाकडे चला हा महात्माजींचा मुलमंत्र घेऊनही आम्ही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाच्या रथाचा वेग वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पाकडे जाणीवपूर्ण लक्ष देत आहे, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.येथील पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी पं.स. तथा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटवार यांच्या हस्ते करण्यात आले. पूढे बोलताना पंचायत समिती समोरील रोडकरिता ३० लाख व आतील फर्निचरकरिता ५० लाख रुपयांची तरतूद येत्या काही दिवसांतच केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.प्रास्ताविकातून सभापती मंगेश खवशी यांनी खैरी धरणाची उंची, महामार्गावरील ओव्हरब्रीजची निर्मिती, एमआयडीसी प्रकल्पाचा विकास व शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजची मागणी केली. माजी आमदार दादाराव केचे यांनीही कारंजा तालुक्यातील जलसिंचनाच्या समस्या मांडल्यातआ. अमर काळे यांनी कारंजातच नव्हे तर महाराष्ट्रात शासनाने ट्रामा केअर युनिटच्या भव्य वास्तू उभ्या केल्या; पण तेथे पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्याने त्या शोभेच्या ठरत असल्याची खंत व्यक्त केली. शेतकºयांना बोंडअळीची नुकसान भरपाई तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. एमआयडीसी सुरू करण्यासाठी अधिग्रहीत जमिनीला योग्य मोबदला देण्यासाठी पुढाकार घ्यावा, इतर नगर पंचायतप्रमाणे कारंजा नगर पंचायतला विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीही केली.लोकार्पण सोहळा दुपारी ४ वाजता सुरू झाला. कार्यक्रमाला पुरूषांपेक्षा महिलांची उपस्थिती अधिक होती. तत्पूर्वी मुद्रा योजना अभियान व वॉटर कप प्रकल्पावर आधारित कार्यक्रम पार पडला. संचालन अनिल चव्हाण यांनी केले तर आभार बिडीओ नंदागवळी यांनी मानले.लोकार्पण सोहळ्याला मंचावर ना. सुधीर मुनगंटीवार, आ. अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, सभापती मंगेश खवशी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, उपसभापती रंजना टिपले, बांधकाम सभापती कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, पं.स. सदस्य जगदीश डोळे, रोषना ढोबाळे, पुष्पा चरडे, आम्रपाली बंसोड, टिकाराम घागरे, चंद्रशेखर आत्राम, जि.प. सदस्य सुरेश खवशी, रेखा धोटे, सरीता गाखरे, निता गजाम, माजी सभापती मोरेश्वर भांगे, कृउबास माजी सभापती शिवाजी खवशी, मुकूंद बारंगे, वसंत भांगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला उमेकर, महाजन व कर्मचाºयांनी सहकार्य केले. इमारतीचे बांधकाम चांगले गेल्याबद्दल अभियंता प्रकाश उगेमुगे व कंत्राटदार रमेश घाडीया यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:35 PM
विकासाबाबत विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. गावाकडे चला हा महात्माजींचा मुलमंत्र घेऊनही आम्ही शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकासाच्या रथाचा वेग वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पंचायत समिती व रुग्णालयाच्या वास्तूचे लोकार्पण