शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

आठव्या दिवशीही शेतकरी संप सुरूच

By admin | Published: June 10, 2017 1:17 AM

कर्जमाफीसह शेतमालाला दर देण्याच्या मागणीकरिता शेतकऱ्यांनी पुकारलेला संपाची वर्धेत आठव्या दिवशीही

हिंगणीत बंद : प्रतिकात्मक अंत्ययात्रेने नोंदविला निषेध; आष्टीत ठिय्या आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कर्जमाफीसह शेतमालाला दर देण्याच्या मागणीकरिता शेतकऱ्यांनी पुकारलेला संपाची वर्धेत आठव्या दिवशीही धग कायम असल्याचे शुक्रवारी दिसून आले. या संपादरम्यान हिंगणी येथे आज बंद पाळण्यात आला तर आष्टी (शहीद) येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी रस्त्यावर कांदे आणि भुईमुंगाच्या शेंगा फेकून संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. व्यापाऱ्यांनी पाळला बंद बोरधरण : शेतकऱ्यांनी कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळावा म्हणून हिंगणी येथे शेतकरी आंदोलन समिती व किसान अधिकार अभियानच्यावतीने शुक्रवारी बसस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून एका प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तो पुतळा पोलिसांनी जप्त केला. हिंगणी येथे शेतकरी आंदोलन समिती व किसान अधिकार अभियान यांच्यावतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला गावात उत्तम प्रतिसाद मिळाला. शेतकरी व गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. हिंगणी-सेलू रस्त्यावर टायर पेटवून काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. आठवडी बाजार बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. किराणा व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्य करत बंद पाळला. हिंगणी येथील बँक आॅफ इंडिया व कॅनेरा बँक काही काळाकरिता बंद ठेवण्यात आली होती. हिंगणी बस स्थानकावरून शेतकऱ्यांनी वाजतगाजत शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा गावात फिरविली. बाजार चौकात पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यानंतर शेतकऱ्यांनी पूर्ण गावात फिरून बसस्थानक येथे येत सरकार विरोधी घोषणा देत निषेध नोंदविला. आंदोलनात अजय डेकाटे, भैया दरणे, हबीब शेख, विजय डेकाटे, अमोल मुडे, जतिन रणनवरे, नितिन निघडे, प्रशांत मुडे, सागर डेकाटे, गणेश रत्नवार, गोविंदा पेटकर, ढोले, संजय डेकाटे, दीपक शंभरकर, एकनाथ बरबडीकर, प्रल्हाद बुधे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.