तहसीलदारांना निवेदन : मागण्यांसह लॅन्कोचा विरोध आकोली : धरणग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी लॅन्को पॉवर कंपनी विरोधात शुक्रवारी भव्य मोर्चा काढला. ज्ञानेश्वर निघोट यांच्या मार्गदर्शनात शिवशंकर मंदिर नंदी गेटजवळून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता खरांगणाचे ठाणेदार प्रशांत पांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे व पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन शासनाने पाळले नाही. धरणग्रस्तांना पैसे घेवूनही वाटप केले नाही. त्यामुळे जमीनीचे वाटप करावे किंवा व्याजासह रक्कम परत करावी, यासह धरणग्रस्तांना दीड लाखाचे अनुदान घरकुलासाठी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचा मोर्चा
By admin | Published: September 05, 2015 1:54 AM