शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:08 PM

महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे.

ठळक मुद्देकापड निर्मितीतून १६ महिलांना रोजगार२८ महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. केवळ उत्पादक न राहता उद्योजक होण्याचा या महिलांचा ध्यास प्रेरणादायक आहे.कापसाला चांगला भाव मिळवून द्यायचा असेल तर कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात साटोडा गावापासून झाली. गावातील १६ महिलांनी कापसापासून खादी कापड तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. यातून त्यांना रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध झाले. कॉटन टू क्लाथ ही संकल्पना साकारणारा प्रकल्प  शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. विदर्भात आपूस हे प्रमुख पीक आहे. पण शेतकऱ्यांना कापूस हा कच्चा माल म्हणून विकावा लागतो. कारण येथे शेतकऱ्यांच्या मालकीच्या  सूतगिरण्या किंवा वस्त्रोद्योग नाहीत. शेतात पिकवलेला कापूस व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने देण्याशिवाय पर्याय नसतो. वषार्नुवर्षे सुरू असलेली प्रथा आजही कायम आहे. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी केम प्रकल्प स्थापन केला. यातून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगाकरिता मार्गदर्शन केले जाते. याचाच लाभ या महिलांनी घेतला. मागील दोन वर्षांपासून दहा गावातील शेतकरी प्रशिक्षण घेऊन स्वत:च कापूस गाठी तयार करतात आणि नंतर विक्री होते. पण यातील नफ्याचे खरे गणित कापड आणि वस्त्रे तयार करण्यात आहे ही बाब लक्षात घेऊन कॉटन टू क्लाथ या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. वर्धा शहरालगतच्या साटोडा येथील विठाई, संस्कृती, महालक्ष्मी, भिमाई या महिला बचत गटाच्या २० महिलांनी हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. मुख्य म्हणजे यातील महिला या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विधायक कृतिशील कायार्पासून प्रेरणा घेऊन निवेदिता मिलयम ही संस्था कार्य करते. या संस्थेचे किशोरभाई यांनी शेतकरी महिलांना हातमाग चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच हातमाग युनिटही तयार करून दिले. केमने ३० टक्के अनुदानावर चार हातमाग युनिट या गावात स्थापन केले. त्यामुळे महिलांना उद्योजक होण्यास हातभार लागला.दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर आॅगस्ट २०१७ पासून १६ महिलांनी ५०० मीटर खादी कापड तयार केले आहे. मुख्य म्हणजे समन्वित शेतकरी उत्पादक कंपनी आणि ग्लोबल इंटरप्रयजेस या कंपनीसोबत तयार कापड विकण्याचा करार केल्यामुळे १५० रुपये प्रति मीटरने खादी कापड विकला जात आहे. यातून महिलांना २०० रुपये प्रतिदिन मजुरी सोबतच कापड विक्रीतून होणाºया नफ्यातील हिस्साही मिळणार आहे. याच गावात आणखी आठ हातमाग युनिट लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालकांनी दिली. त्यामुळे अधिक महिलांना रोजगाराची संधी गावातच उपलब्ध होणार आहे. शिवाय गावातील शेतकऱ्यांना या हंगामात कापूस व्यापाऱ्यांना विकण्याची गरज भासणार नाही. थेट कापड तयार करून विक्रीचा पर्यायही महिलांनी उपलब्ध आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस