यावर्षी या भागात सोयाबीन व कपाशीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. शेतकऱ्यांनी तुरीसह इतर पिकांची पेरणी केली असून, काही शेतकऱ्यांकडे संत्रा व मोसंबीच्या बागा ही आहे. या परिसरातील शेतशिवारात दरवर्षी रोही व रानडुकरांचा वावर असतो. त्यांना जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा जंगलालगतच्या शेतातील कपाशी व सोयाबीन सोबतच संत्रा व मोसंबीच्या झाडांचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. रब्बी हंगामात हेच वन्यप्राणी खाद्य व पाण्याच्या शोधात गावालगतच्या शेतात येतात व संत्रा मोसंबीच्या बागांसोबत रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जावे लागते. काही शेतकरी शेतातील मचाणावरून पिकाची पाहणी करीत वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवतात. तर काही शेतकरी रात्रभर पिकांच्या संरक्षण करण्याकरिता जागल करतात. अंधारात त्यांना विषारी सापांचा व अन्य घातक कीटकांचा दंश होण्याची व जीव गमावण्याची भीतीदेखील असते. वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली तर तुटपुंजी मदत मिळते. यामुळे नुकसान भरपाई मागण्यासाठी शेतकरी धजावत नाही.
060921\img-20210813-wa0035.jpg~060921\img-20210813-wa0036.jpg
शेतकरी हिरामण कडू यांच्या शेतात रानडुकरांनी उद्ध्वस्त केले कपाशीचे पीक~शेतकरी हिरामण कडू यांच्या शेतातील उध्वस्त केले कपाशीचे पीक