लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. शेतकºयांच्या हितांसाठी कार्य करणाºया संगठनांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. शासनाने सुध्दा राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हित जोपासणारी असावी असे मत बाबा आढाव यांनी मांडले.येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या शेती प्रश्नावर राष्टÑीय परिसंवादात ते बोलत होते. हा परिसंवाद सर्व सेवा संघ व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित आहे.सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले, महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त दोन दिवसीय परिसंवाद आहे. देशाच्या पोशिंद्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग उद्भवत आहे. हक्काकरिता शेतकºयांना आंदोलन करावे लागत आहे. शेतकºयांच्या समस्या मांडणाºयांना कायद्याचा दम दिल्या जात आहे. सुधाकर जाधव यांनी शेतकºयांनी शेतीला व्यवसायिक स्वरूप दिले पाहिजे. परंपरागत ज्ञान, तंत्र, विचार बाजूला ठेवून स्वातंत्र्यपणे फायद्याची शेती कशी करता येईल यावर भर दिला पाहिजे. पुर्णत: शेतीवर व काही अशी शेती करणारे यात शेतीवरच अवलंबून असणाºयांची हलाखीची स्थिती दिसून आली.आजच्या सत्रात शेतीमधील आवाहने व सरकारची भूमिका, कृषी मुल्य निर्धारनातील त्रुटी व सुधारणांची आवश्यकता आदी विषयांवर सुभाष वारे, जयदीप हार्डीकर, राजू भिसे, श्रीकांत बाराहाते आदिंनी मते मांडली.परिसंवादाच्या उद्घाटन सत्राचे संचालन व संयोजन किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी केले.
राजकीय नाही तर सामाजिक स्तरावर शेतकºयांचे हीत जोपासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:13 AM
हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा.
ठळक मुद्देबाबा आढाव : सेवाग्राम येथे शेती प्रश्नावरील राष्टÑीय परिसंवादाचे उद्घाटन