लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर प्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सोमवारी विभागीय आयुक्त नागपूर संजीवकुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.यात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे. परंतु याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नॅशनल हायवेज अॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आयुक्ताना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेती संपादित करण्यात आल्यामुळे शेतकºयांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संषर्घ वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी केले. यावेळी शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अरविंद देशमुख, सतीश मेहत्रे, अविनाश कुबडे, चंद्रकांत मेहत्रे, धनंजय चरडे, किशोर मडावी, प्रताप चरडे, जगदीश बदरीया, भूजंग वाघ, निलेश वाघ, विनोद फटींग, लक्ष्मण बदरिया, अशोक रोडे, रमेश बदरिया, बाबाराव वांदीले, कुणाल देशमुख, दत्ता राऊत आदी उपस्थित होते.यावेळी निवेदन देताना अभिजित फाळके म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेच्या नाकाखाली नॅशनल हायवे जमीन अधिग्रहण प्रकरणात शेतकºयांचे शोषण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सर्र्व चौरस गुणकानुसार अधिग्रहणाचे काम झाले असताना येथे हेक्टरी मापाने अधिग्रहण का ? असा सवाल आहे.
मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 9:46 PM
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर ...
ठळक मुद्देभूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे नेतृत्व : शेतकºयांचा चौरस मिटर प्रमाणे रक्कम द्या