लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतात उभे असलेले पीक व कापून ठेवलेले पीक असे दोन्ही पावसामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चिकणी येथील कापूस विक्रीला नेण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलबंड्या भरून ठेवल्या होत्या. मात्र गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने या बंड्या ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न केला मात्र कापूस काही प्रमाणात ओला झालाच.वडनेर येथे कापूस तूर, गहू आणि चणा या पिकांचे नुकसान झाले. गेल्या ४-५ वर्षांपासून दुष्काळ सहन करत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी अशी दोन्ही संकटे आली आहेत.
शेतकऱ्यांचे संकट संपेचिना, परतीचा पाऊस पिच्छा सोडेचिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:47 PM