शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शेतकऱ्यांची मशागत पोहोचली अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:16 AM

रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकºयांना सहन कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : मान्सून लांबल्याने शेतीकामाकरिता मिळाला आणखी काही काळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पहाटेच्या सुमारासच कामे होत असल्याचे दिसून आले आहे.गत वर्षी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकात घट झाली. शिवाय वेचणीचा खर्च वाढुनही कापसाचे दर शेवटपर्यंत चार हजारापासून पाच हजारापर्यंत पाहायला मिळाले. काही शेतकऱ्यांना मागाहून निघालेला कापूस तीन हजाराच्या घरात विकावा लागला. त्यामुळे गत वर्षीला बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिधडली. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ९५० कृषी केंद्रात शासनाच्या निर्देशानुसार बियाणे दाखल होत आहे. कृषी केंद्रावर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांकडून किमतीची विचारणा होत आहे. कपाशीच्या बियाण्यांच्या जाहिरातीला सुरुवात झाली असून गावखेड्यात भिंतीवर पोस्टर लावण्याच्या सफाटा सुरू आहे. गत हंगामात किपाशीच्या बिटी बियाण्यावर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या हंगामात कपाशीच्या बियाण्यावर शासनाने धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणानांच विक्री परवाना दे्ण्यात आला आहे.गत हंगामात बोंडअळीने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने यावर्षी लवकर येणारे वाण शेतकरी निवडणार असल्याने बोलले जात आहे. शिवाय सोयाबीनच्या बियाण्यांत यावर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याने मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून पावसाची प्रतीक्षा आहे.लवकर येणाऱ्या वाणाला मिळणार पसंतीशेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. गत हंगामात कपाशीच्या बियाण्यांवर आलेल्या बोंडअळीमुळे शासनाने कपाशीच्या वाणांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होत असून राज्यात केवळ कपाशीच्या ३७० वाणांनाच मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात बियाणे दाखल होणे सुरू झाले आहे. या बियाण्यांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी याकरिता कंपन्यांच्यावतीने गावखेड्यात घराच्या भिंतीवर, प्रवासी निवाऱ्यांवर कंपनीच्या वाणांच्या जाहिराती करणे सुरू झाले आहे.शेतकऱ्यांकडूनही बाजारात बियाण्यांच्या दराबाबत दुकानात जाऊन चौकशी करणे सुरू झाले आहे. यात कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विविध प्रलोभन देण्याचा प्रकार होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी