लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे ऐन सुगी व लग्न सराईचा जवळपास एक महिना वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यापुढील व्यवहार कधी सुरळीत होतील हे सांगणे कठीण आहे. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे, मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर कोरोनाचा विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक अडचण होत आहे.कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे. तो कुठे कसा विकायचा याचे नियोजन नाही. त्यातच ही परिस्थिती कधी बदलेल हे सांगणेही अवघड असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. तर कापूस व तुर घरातच किडे लागून खराब होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे.वधूपित्यांचा जीव टांगणीलाशेतकरी डिसेंबरपासूनच मुलींसाठी ईच्छित स्थळ शोधून तारीख पक्की करतात, सुगी संपल्यानंतर एप्रिल, मे दरम्यान लग्नाच्या तारखांना प्राधान्य असते. यावर्षीही अनेकांनी या दरम्यानच्या तारखा काढून मंगल कार्यालये,बॅडवाले, मंडपवाले सांगून ठेवले होते. परंतु आता कोरोनात ते होईनासे झाले आहे. तर लग्नसराईच संकटात असल्याने जनजीवनच विस्कळीत झाले आहे. लग्नसराई ही अनेकांना रोजगार देणारी असते.यामध्ये मंडपवाले, वाहनधारक, स्वयंपाकी यांनाही लग्न नसल्याने घरीच थांबावे लागत आहे.टरबूज, खरबूज, टोमॅटो कवडीमोल भावातअनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनाला खर्च करीत टरबुज,खरबुज,टोमॅटो,काकडी अशी पिके घेतली असून त्यासाठी अमाप खर्च केला आहे. ती पिके निघण्याच्या काळातच हा विषाणू आल्याने पिके विकण्याची पंचाईत झाली आहे.काही शेतातच तोडणीअभावी खराब होत आहे, तर तोडलेला मालही कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM
कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे.
ठळक मुद्देबाजारात माल नेण्याऐवजी दुचाकीवर विकण्याची वेळ